गॅंग रेपची मोठी बातमी....!

अयोध्या येथील संतापजनक घटना!!

Aug 4, 2024 - 21:07
 0  597
गॅंग रेपची मोठी बातमी....!

 टीव्ही चॅनल youtube पोर्टल आणि वर्तमान पत्रात अयोध्येत घडलेल्या गॅंगरेपची खळबळजनक बातमी मराठीत दिसली तर आश्चर्यच वाटेल. मित्रांनो हा देखील एक नेरेटिव्ह आहे. ही खळबळ जनक आणि संतापजनक बातमी आहे अयोध्यामधील. बारा वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर दोघा नराधमांनी कुकर्म केले, हा नराधम आहे मोईद खान. जो अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षाचा पदाधिकारी आहे. आणि अयोध्या येथून निवडून आलेले खासदार अवधेश प्रसाद यांचा निकटवर्तीय आहे. ही घटना उघडकीस आल्यानंतर राहुल गांधी अखिलेश यादव आणि त्यांचे समर्थक यांनी चुप्पी साधली आहे. याचे कारण मुस्लिम वोट बँक. अयोध्याजवळील भदरसा या शहराचा समाजवादी पक्षाचा अध्यक्ष असलेला मोईद खान आणि त्याचा सहकारी यांनी बारा वर्षाच्या एका अल्पवयीन मुलीवर कुकर्म केले आहे. मागास समाजातील ही मुलगी जेव्हा, प्रेग्नेंट राहिली, तेव्हा तिच्या विधवा आईला ही गोष्ट कळाली. मोईदखान ही बडी असामी असून त्याची या भागात, अनेक जमिनी, प्रॉपर्टी तसेच मोठी बेकरी आहे. या बेकरीमध्येच हा संतापजनक प्रकार सुरू होता. आपली मुलगी सापडत नाही म्हणून तिचा शोध घेतला असता या ठिकाणी ही पीडिता वस्त्रविहीन अवस्थेत आढळून आली. या बेकरीत खाद्यपदार्थ आणण्यासाठी गेल्यानंतर तिच्यावर बळजबरी होत असे. याविषयी पीडीतेच्या आईने पोलिसात तक्रार दिली असता आणखी एक खळबळजनक मुद्दा समोर आला, सदरची पोलीस चौकी मोईदखानच्या जागेवरच उभारली गेलेली आहे. त्यामुळे पोलिसांनी मोईदचे नाव वगळा तरच तक्रार दाखल करून घेतो असे म्हणून पीडितेच्या आईस पिटाळून लावले. हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांना ही बाब समजल्यानंतर त्यांनी आयोध्येमध्ये पोलीस स्टेशनवर मोर्चा काढला. तेव्हा कुठे या अत्याचाराला वाचा फुटली आणि गुन्हा दाखल झाला. लोकसभा निवडणूकपासून अयोध्या पुन्हा चर्चेत आली, याचे कारण म्हणजे या ठिकाणी भाजपा उमेदवार पराभूत झाला, सपाचे अवधेश प्रसाद हे निवडून आले. संसदेत यांची जागा अखिलेश यांच्या शेजारीच आहे आणि अखिलेश यांनी अवधेश यांचा उल्लेख, अयोध्येचा राजा म्हणून, अभिमानाने करतात. विशेष म्हणजे राहुल गांधी यांनी देखील , त्यांच्या विजयाचे अवधेश यांचे कौतुक केले आहे. मात्र अयोध्येतील या गँगरेपच्या घटनेनंतर, अखिलेश आणि राहुल यांची बोलतीच बंद झाली आहे. कारण या गॅंगरेपचा सूत्रधार मोईद खान आहे. आपली वोट बँक दुखावू नये म्हणून या घटनेवर पडदा घालण्याचा प्रयत्न सुरू आहे. 

 गेल्या महिन्यात अयोध्या राम मंदिरात काही ठिकाणी पावसाने गळती दिसली त्याचे मोठे भांडवल राहुल आणि अखिलेश यांनी केलेच शिवाय मीडियाने् माध्यमांनी चांंगलेच कव्हरेज केले. आयोध्यामध्ये जाणाऱ्या भक्ताने तेथे बहिष्कार टाकावा , न्यारेटिव्ह देखील देखील , तयार केला. परंतु बारा वर्षीय एका अल्पवयीन मागासवर्गीय मुलीवर अत्याचाराची काळीमा फासणारी घटना घडल्यानंतर देखील ही न्यूज आणि कव्हरेज शोधूनही सापडणार नाही, हा न्यारेटीव देखील , माध्यमांकडून कळून चुकला.

      लोकसभा निवडणूक, सपाचा विजय, भाजपाचा पराभव, राम मंदिरात गळती आणि खासदार , अवधेश प्रसाद यांचे कौतुक या बाबी, माध्यमाने कधीच नजरेआड केला नाहीत. परंतु , गॅंगरेपच्या घटनेवर , मीडियाने चक्क बुरखा घातला आहे. परंतु सजग अयोध्यावासी नागरिकांनी हा बुरखा टराटरा , फाडला आहे. अर्थातच लोकशाहीचा आवाज दाबण्याचा हा प्रकार आहे म्हणून गॅंग रेपची वर्तमानपत्रात आलेली, मोठी बातमी कळून चुकली उत्तर प्रदेशात समाजवादी पक्ष , पीडीए म्हणवून घेतो. पी. डी. ए. म्हणजे पिछडा, दलित, आगडा. परंतु या घटनेमुळे अखिलेश यादवांचा समाजवादी पक्ष पिछडा आणि दलित तसेच अल्पवयीन मुलींचा तारणहार आहे का, असा प्रश्न उपस्थित होतो. याउलट आपली वोटबँक टिकवून ठेवण्यासाठी , ही निर्मम अत्याच्चार देखील, दडपून टाकण्यासाठी प्रयत्न करतो, ही बाब लक्षात घेतली पाहिजे. दुर्दैवानं माध्यमं देखील हातभार लावत आहेत हा मेसेज, समाजात पसरत आहे. दिल्लीतील निर्भया कांड, महाराष्ट्रातील कोपर्डी हत्या, मुंबई उरण येथील लव जिहाद आणि अयोध्या येथील अत्याचार या सार्र्यांचा घटनाक्रम पाहता, राजकीय सामाजिक आणि लोकशाहीवादी निर्भय विचारप्रणालीची हत्या होते, तेव्हा पक्षपातीपणा समोर येतो. नव्हे दिसतो. आणि मेणबत्या पेटवणारे आणि लाखांचे मोर्चे काढणारे ते घटक आता कुठे हरवले आहेत, असा प्रांजळ प्रश्न देखील उपस्थित होतो.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow