प्र.१३ मध्ये भाकरी फिरणार, शिवसेनेचे उमेदवार दक्ष
प्र.१३ मध्ये भाकरी फिरणार, शिवसेनेचे उमेदवार दक्ष
सोलापूर : सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक १३ मध्ये यंदा मतदार भाकरी फिरवण्याच्या तयारीत असल्याचे संकेत असून प्रचारात सेनेच्या चारही उमेदवारांनी जोरदार दक्ष प्रचार केला.
प्रभाग क्रमांक १३ मधील शिवसेना (एकनाथ शिंदे गट)चे उमेदवार जयंत होलेपाटील (क), श्रीधर आरगोंडा (ड), सौ. गीता अजय गोणे (म्हेत्रे) (अ), सौ. शिवम्मा सोमनाथ बंदपट्टे (ब) यांपैकी बहुतांश उमेदवार परिवार व हिंदुत्ववादी संघटनांमध्ये सक्रिय राहिलेले आहेत. मतदारांमध्ये त्यांच्याबद्दल आपुलकी व विश्वास आहे.
पूर्व भागात लोकसभा असो वा विधानसभा निवडणूक — याच कार्यकर्त्यांनी भाजपासाठी काम केले आहे. मात्र महापालिका निवडणुकीत भाजपकडून काँग्रेसी विचारधारेचे अनेक उमेदवार घेतले, यामुळे या उमेदवारांनी सेनेचा भगवा हाती घेतला आहे.
जयंत होलेपाटील (क) हे नामांकित बांधकाम व्यावसायिक व उद्योजक आहेत. त्यांनी राजकारणात चांगले बदल घडवण्यासाठी उभे आहेत. पूर्व भागाच्या सर्वांगीण विकासाचा ध्यास घेऊन उभे आहेत.
श्रीधर आरगोंडा (ड) हे संघाच्या संस्कारातून घडलेले आहेत. तसेच विवेकानंद केंद्राच्या मासिकाचे उपसंपादक, समाजहितासाठी सातत्याने कार्यरत असतात.
हिंदुराष्ट्र सेनेचे शहराध्यक्ष रवि गोणे यांच्या वाहिनी सौ. गीता अजय गोणे (अ) या देखील निवडणुकीच्या रिंगणात आहेत. अन्यायाविरुद्ध आवाज आणि नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी तत्पर ही त्यांची ओळख आहे.
समाजसेवक सोमनाथ बंदपट्टे यांच्या पत्नी सौ. शिवम्मा बंदपट्टे (ब) या यापूर्वीच्या निवडणुकीत शिवसेनेकडून उमेदवार होत्या. त्या वेळी त्यांनी सुमारे साडेतीन हजार मते मिळवली होती. विशेष म्हणजे प्रभागाचा समतोल राखण्यासाठी प्रभागाच्या चारही भागांतून उमेदवार देण्यात आले आहेत.
यामुळे प्रभाग क्रमांक १३ मध्ये शिवसेना (एकनाथ शिंदे गट)ची बाजू मजबूत मानली जाते. याला बळ मिळाले मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे साहेबांच्या ‘लाडकी बहीण योजनेमुळे’. या योजनेचा लाभ तळागाळातील महिलांना मिळत असल्याने शिवसेना व एकनाथ शिंदे यांच्याबद्दल मतदारांमध्ये विशेष आपुलकी आहे.
पॅनल प्रमुख जयंत होलेपाटील यांच्यासोबत उभे असलेले उर्वरित तिन्ही उमेदवार अत्यंत सामान्य व तळागाळातील कुटुंबातून आलेले असल्याने मतदारांमध्ये वेगळीच सकारात्मक प्रतिमा तयार झाली आहे. आजपर्यंत झालेल्या कामांबाबत नागरिकांमध्ये नाराजी असून शिवसेनेच्या या पॅनलकडे नवीन विकासदृष्टी (व्हिजन) आहे. याच व्हिजनमुळे युवा मतदारांमध्ये शिवसेना व धनुष्यबाण चिन्हाबद्दल क्रेझ निर्माण झाली आहे.
चारही उमेदवारांनी डोअर-टू-डोअर प्रचा व थेट नागरिकांशी संवाद साधल्याने लोकांशी नाळ जोडली गेली आहे. नागरिकांच्या समस्या ऐकून घेतल्याने समाधान आहे.
त्यामुळे महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक १३ मध्ये मतदार भाकरी फिरवून भगवा फडकवतील, असा विश्वास चारही उमेदवारानी व्यक्त केला आहे.
What's Your Reaction?