लक्ष्यवेधचा परफेक्ट नॅरेटिव्ह! कोंड्याल महापौर व देवकर उपमहापौरपदी अविरोध

लक्ष्यवेधचा परफेक्ट नॅरेटिव्ह! कोंड्याल महापौर व देवकर उपमहापौरपदी अविरोध

Feb 7, 2026 - 12:08
 0  156
लक्ष्यवेधचा परफेक्ट नॅरेटिव्ह! कोंड्याल  महापौर व देवकर  उपमहापौरपदी अविरोध

(विजयकुमार पिसे)

महापौर आणि उपमहापौर पदाची निवड *बिनविरोध होणे अपेक्षित आहे, असे लक्ष्यवेध मधून काल 6 रोजी 'स्वीकृत सदस्य' बातमीमध्ये पहिलेच वाक्य म्हटले होते. तेच तंतोतंत खरे ठरले. अचूक लक्ष्यवेध आणि परफेक्ट नॅरेटिव्ह. शिवाय 

'जय भाजपा, तय भाजपा' ही टॅगलाईन देखील अंमलात आणली गेली. विनायक कोंड्याल महापौर आणि देवकर उपमहापौर यांच्या विरोधातील शिवसेना व एमआयएमच्या उमेदवारांनी अर्ज मागे घेतला. आणि भाजपाचे उभय उमेदवार बिनविरोध निवडून आले. एमआयएम आणि भाजपा यांच्यात आता फारसे अंतर राहिलेले नाहीच. हे देखील यानिमित्ताने लक्षात घेतले पाहिजे.

    महापालिका निवडणुकी आधीच महापौर कोण होणार तर विनायक कोंड्याल ही टॅगलाईन होती. त्यामुळे त्यांच्याच गळ्यात महापौर पदाची माळ पडली. कोंड्याल सुनील नगर एमआयडीसी भागातून चौथ्यांदा निवडून आले आहेत. आणि कमी वयात त्यांना संधी मिळाली आहे. शिवाय अलीकडेच त्यांनी भाजपात प्रवेश केला. तरीही पक्षाने कोंड्याल यांचेवर विश्वास व्यक्त केला आहे. देवकर प्रथमच निवडून आलेल्या विजयपूर रोड भागातील नगरसेविका. ज्ञानेश्‍वरी देवकर यांना उपमहापौरपदाचे सरप्राईज गिफ्ट मिळाले आहे. त्यांचे नाव कुणाच्याही ध्यानीमनी नव्हते.

अखेर काल 6 फेब्रुवारी रोजी त्यांच्या निवडीवर मोहोर उमटविली.

   कोंड्याल प्रभाग 12 मधून विजयी झाले आहेत. 2007 मध्ये पहिल्यांदा काँग्रेसच्या तिकीटावर निवडून आले. गतवेळी त्यांनी शिवसेनेकडून निवडणूक लढवली होती. यंदा भाजपात प्रवेश करून सलग चौथ्यांदा विजय संपादन केला. त्यांना मनपा स्थायी समिती सभापती पदाचा अनुभव आहे. ज्ञानेश्‍वरी देवकर या प्रथमच निवडून आल्या असल्या तरी त्यांचे पती महेश देवकर दोन वेळा मंडल अध्यक्ष भाजपाचे काम करीत आहेत. 

महापौर व उपमहापौर निवडणुकीत प्रथमच निवडून आलेल्या नगरसेवक यांना मतदान व मतदान प्रक्रियेची उत्सुकता होती. अविरोधमुळे त्यांची निराशा झाली. अनेक नाराज निष्ठावंत नगरसेवक उमेदवार निवडीवर नाराज होते. हात वर करून मतदान व ते कुणाला असे नमूद करणे अनिवार्य होते. त्यांच्यावर अशी वेळच आली नाही. शिवाय प्रशासनाला देखील ही गुंतागुंत करावी लागली नाही. अर्थात...

    महापौरपद खुला प्रवर्ग आहे. तरी देखील भाजपाकडून 

ओबीसी प्रवर्गाला संधी दिली आहे. खुल्या गटासाठी संधी द्यावी, असा आग्रह होता. अनंत जाधव यांचे नाव शर्यतीत होते. भाजपाच्या जाहीरनाम्यात दररोज पाणी देण्याचा शब्द दिला आहे. महापौर कोंड्याल व उपमहापौर देवकर हे आव्हान स्वीकारून विनाविलंब कार्यवाही करतील. यात शंका नाही. शिवाय त्याचबरोबर पालकमंत्री गोरे, आ. कोठे आणि आ.कल्याणशेट्टी हे त्रिमूर्ती नूतन महापौर व उपमहापौर यांच्या पाठिशी आहेतच. त्यामुळे विकास वेगवान होईल, यात शंका नाही. उभयतांना लक्ष्यवेध न्यूज तर्फे मनःपूर्वक शुभेच्छा आणि अभिनंदन!

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow