फडणवीसांच्या पोतडीतून काय काय मिळणार?सोलापूरकरांचे आहे लक्ष।
गत दौर्यामध्ये आयटी पार्कची घोषणा आणि 15 दिवसात कार्यवाही. पंढरपूर कॉरिडॉर, आयटी पार्क, विमानसेवा आणि पायाभूत सुविधांची चर्चा
सोलापूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गत वेळी सोलापूर दौर्यात आले, तेव्हा आयटी पार्कची घोषणा केली. 15 दिवसात जागा शोधा, असे सुचविले. त्यापप्रमाणे कार्यवाही झाली. आता आज त्यांच्या सोलापूर दौर्याकडे देखील असेच लक्ष आहे. फडणवीसांच्या पोतडीत काय काय आहे,याची उत्सुकता आहे.
पंढरपूर कॉरिडॉर, आयटी पार्क, विमानसेवा तसेच पायाभूत सुविधा, उद्योग, रोजगार, धार्मिक पर्यटन आणि वाहतूक सक्षमीकरण या विषयांवर ठोस निर्णय अपेक्षित आहे.पंढरपूर कॉरिडॉर रखडला आहे. तो लवकर मार्गी लागावा, अशी मागणी आहे. या प्रकल्पामुळे धार्मिक पर्यटनाला चालना मिळेल.युवकांसाठी आयटी पार्कची उभारणी, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील संधी यामुळे रोजगार निर्मितीमधील गतिरोध कमी होईल. विमानसेवेचा विस्तार, नाईट लॅन्डींग, सोलापूर-तिरुपती विमानसेवा या मागण्याही पुढे येत आहेत. शक्तिपीठ महामार्ग, सुरत-चेन्नई ग्रीनफिल्ड हायवे प्रकल्प याचीही अपेक्षा आहे. यामुळे सोलापूर राष्ट्रीय स्तरावर वाहतूक व व्यापार केंद्र म्हणून विकसित होऊ शकतो.याशिवाय वाढत्या वाहतूक समस्या, वाढते अपघात, यामुळे दोन उड्डाण पुलांची कार्यवाही रखडली आहे. गत दौर्यात आलेला अनुभव पाहता आज गौरव सोहळ्यात फडवीस सोलापूरकरांना काय गिफ्ट देणार, याची उत्सुकता आहे.
What's Your Reaction?