Rohit Pawar : रो'हिट' उपोषणाने विधान परिषद निवडणूक हायजॅक
संकटमोचकांची भेट अन् देवाभाउंचे ठोस आश्वासन, अखेर पवारांची सशर्त माघार
पंढरपूर : एकीकडे रूसलेल्या पावसातही सत्ताधार्यांमध्ये विधान परिषद निवडणुकीचा पेटलेला ज्वर, असे राजकीय चित्र, तर दडलेल्या पावसामुळे महाराष्ट्रावर दुष्काळाची भीती. या पार्श्वभूमीवर शेतकर्यांच्या सरसकट कर्जमाफीसाठी आ.रोहित पवार यांनी पंढरीत अन्नत्याग आंदोलनाचे अस्त्र उगारून सत्ताधार्यांची गरमागरम *विधान परिषद निवडणूक #हायजॅक केली.
अशा स्थितीत संवेदनशील मुख्यमंत्र्यांनी संकटमोचकांना पंढरपुरात धाडून आ.पवारांचे उपोषण माघार घेण्यास भाग पाडले. आठवड्यातील या सार्या घडामोडी पाहता, उरलेल्या तीन दिवसात विधान परिषद निवडणुकीसाठी नेते, नगरसेवकांचे *रिसॉर्ट पर्यटन सुरू होईल.
पंढरपुरात 14 रोजी रविवारी रात्री साडेेअकरा वाजता राज्याचे ज्येष्ठ मंत्री गिरीश महाजन यांनी आ.रोहित पवारांच्या उपोषण स्थळी भेट घेत यशस्वी समेट घडवून आणला. येत्या 22 जूनपासून पावसाळी अधिवेशन होत असून, त्याआधी शेतकरी कर्जमाफीबाबत निर्णायक बैठकीचे आश्वासन मिळाले आहे. त्यामुळे आ.रोहित पवार यांनी आपलं उपोषण स्थगित करत असल्याची घोषणा यावेळी केली. विशेषत: सोलापूर जिल्हयातील सध्या सुरू असलेली सत्ताधार्यांची विधान परिषद निवडणूक आ. पवारांनी *रो'हिट' केली.
आ.रोहित पवार शुक्रवारपासून अन्नत्याग आंदोलनास बसले होते. उपोषणाचा तिसरा दिवस होता. त्यामुळे त्यांची आज प्रकृती खालावली होती. त्यांचे कुटुंबिय देखील तिथे तळ ठोकून होते. अखेर महाजनांच्या समवेत सकारात्मक चर्चा झाल्यानंतर आ.रोहित पवारांनी नामदेव पायरी येथे जाऊन उपोषण सोडणार, असे जाहीर केले.
या चर्चेच्या दरम्यान महाजन यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत संपर्क करून त्यांच्याशी बोलणी केली. मुख्यमंत्री फडणवीस यांनीही आ. रोहित पवारांना सकारात्मक प्रतिसाद दिला. गिरीश महाजन यांनी रोहित पवारांना अन्नत्याग आंदोलन करण्याआधी मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र पाठवणं अपेक्षित होतं, असं म्हटलं. मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन आपली भूमिका मांडली असती तर चर्चेतून मार्ग निघाला असता, असेही ते म्हणाले.
#महाजनांचे 11 दिवसांचे ते उपोषण..
*#गिरिश महाजन यांनी कापसाला दर मिळावा म्हणून 11 दिवस जळगावात केलेल्या उपोषणाची आठवण यावेळी आ.रोहित पवारांना करून दिली. तेव्हाच्या सरकारचे नेते अजीतदादा यांनी माघारबाबत कसलाच प्रतिसाद दिला नाही. मंत्री गुलाबराव देवकर यांचे घर उपोषणस्थळापासून 500 फूट अंतरावर होते, त्यांनी इकडे ढुंकूनही पाहिले नाही. त्यामानाने आताचे (देवाभाउंचे) सरकार किती संवेदनशील आहे, हे महाजन यांनी अधोेरेखित केले.Pandharpur
What's Your Reaction?