आयटीआय जिहाद; विद्यार्थिनी व कर्मचारी छळाचा विषय विधी मंडळात

150 हिंदू विद्यार्थिनी आणि 9 कर्मचारी यांचा धार्मिक छळ आरोप ! विधान परिषदेत लक्ष्यवेधी

Jun 25, 2026 - 15:04
 0  6
आयटीआय जिहाद; विद्यार्थिनी व कर्मचारी छळाचा विषय विधी मंडळात

सोलापूर - येथील शासकीय महिला/मुली औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये (डफरिन चौक आयटीआयमध्ये) कथित कॉर्पोरेट जिहादचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून हा प्रकार समोर उघडकीस आल्यानंतर केवळ चौकशीचा फार्स करून या मुली/महिला या आयटीआय संस्थेमधील नाहीत, अशी भूमिका घेतली जात आहे. प्राथमिक माहितीनुसार 150 विद्यार्थिनी आणि 9 हिंदू कर्मचारी यांचा शारीरिक, मानसिक आणि धार्मिक छळ झाल्याचे समोर आले आहे. याबाबत हिंदुत्ववादी संघटनांनी चौकशीची मागणी राज्य सरकारकडे केली आहे. यामुळे विधान परिषदेत आ.मनीषा कायंदे यांनी लक्ष्यवेधी उपस्थित केली आहे.

  तसेच या संदर्भात संस्थेच्या काही कर्मचार्‍यांनी 27 मार्च 2026 या दिवशी कौशल्य विकास विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांना लेखी निवेदन देऊन कारवाईची मागणी केली आहे.

    या निवेदनानुसार आरोपांची चौकशी करण्यासाठी शासनाने समिती स्थापन केली असून या समितीच्या पथकाने नुकतीच औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या महाविद्यालयाला भेट दिली, असा खुलासा विधी मंडळात सरकारने केला.

   दरम्यान यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न प्रशासकीय पातळीवर सुरू असल्याचे दिसून येते. प्रसार माध्यम, मिडियांमध्ये याविषयी काही येणार नाही, याची देखील खबरदारी घेतली जात आहे.

   संस्थेतील गटनिर्देशक रमेजा यांनी रुखसार नामक महिलेची नियमबाह्य पद्धतीने तासिका तत्त्वावर नियुक्ती केली. रुक्सार या विद्यार्थिनींना प्रेम करा, पालकांनी विवाहाला अनुमती दिली नाही, तर स्वतःचे हात कापून घ्या, अशी अत्यंत विकृत आणि प्रक्षोभक शिकवण देत होत्या. याचा अर्थ या ठिकाणी विपरित असे धडे दिले जात होते. याव्यतिरिक्त रमेजा यांनी हिंदू विद्यार्थिनींची नावे वेगवेगळ्या मुलांसमवेत जोडून त्यांची अपकीर्ती केली. हिंदू विद्यार्थिनींची नावे ज्यांच्याशी जोडण्यात आली होती, ते बहुतांश अहिंदू असल्याचा आरोप केला जात आहे.

दरम्यान या संदर्भात सकल हिंदु समाजाचेवतीने मुख्य कार्यालयीन चौकशी समितीच्या अध्यक्षांना निवेदन दिले अशी माहिती आहे.

संस्थेत अत्यंत विषारी धार्मिक वातावरण निर्माण केले गेले. पार्लर ट्रेडच्या (एक व्यावसायिक अभ्यासक्रम) एका विद्यार्थिनीला ताप आला म्हणून सुटी हवी होती. तेव्हा तिला तिच्या कुंकू लावण्यावरून तू कुंकू लावतेस, तू आजारी असू शकत नाही, अशी हिंदू धर्मविरोधी आणि अपमानास्पद टिपणी महिला शिक्षिका यांनी केली. मासिक पाळीच्या काळात विद्यार्थिनींना स्वच्छतागृहाचा वापर करता येऊ नये, यासाठी पाणी अल्प प्या, असा अमानवीय सल्ला दिला जात गेला, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. रमेजा मुसलमान विद्यार्थिनींना हिंदू शिक्षकांविरुद्ध भडकवत होत्या. 1) हिंदु कर्मचार्‍यांना जाणीवपूर्वक त्रास देऊन पदावरून काढण्यात आले आणि त्यांच्या जागी कोणत्याही विज्ञापन/जाहिरातीाविना किंवा अनुभवाशिवाय अल्पसंख्यक समुदायाच्या व्यक्तींची भरती करण्यात आली. 2) कायमस्वरूपी कर्मचारी श्रीमती स्वाती यांना जाणीवपूर्वक त्रास देऊन हाकलून लावले. टी.डब्लू.पी.टी. (टेक्सटाइॅल वेट प्रोसेसिंग टेक्निशिअन हा एक व्यावसायिक अभ्यासक्रम) या शाखेचे पद रिक्त होताच त्याचीही जाहिरात न देता अनुभव नसतांनाही नाहिद यांची भरती केली गेली. फ्रूट अँड व्हेजिटेबल ट्रेडचा अनुभव नसताना अलमास यांची येथे भरती केली गेली. 3) तासिका कर्मचारी तमन्ना या 5 महिने कामावर अनुपस्थित असूनही तिथे हिंदू व्यक्तीची नेमणूक होऊ नये; म्हणून 5 महिने मुलींना त्यांच्याकडील विषय शिकवलाच नाही आणि नंतर तिथेही मुसलमान व्यक्तीचीच भरती केली गेली. 4) प्रवेश प्रमुख असल्याचा अपलाभ घेत रमेजा नावाच्या शिक्षिका हिंदु मुलींना प्रवेशाची पूर्ण माहिती देत नाहीत, तर मुसलमान मुलींना प्राधान्य देऊन आरीफ यांच्या वर्गात त्यांना वेगळे बसवून शिकवले जाते.

5) कर्मचार्‍यांच्या देयकांवर स्वाक्षरी करण्यासाठी रमेजा यांच्याकडून प्रत्येक महिन्याला लाचेची मागणी केली जाते, असाही प्रकार समोर आल्याचे कळते. 6) शासनाकडून प्रात्यक्षिक करण्यासाठी कच्चा माल विनामूल्य मिळत असतानाही रमेजा आणि इतर मुसलमान कर्मचारी विद्यार्थिनींना बलपूर्वक आणि बाजारभावापेक्षा अधिक दराने गणवेश कापड आणि कपडे सिद्ध करण्याचे साहित्य घेण्याची सक्ती देखील केली जात होती.

7. स्वच्छता कर्मचारी अर्चना जाधव यांना काढून जाकिर यांना भरती केले. विरोधामुळे अर्चना जाधव यांना पुन्हा घेतले असले, तरी आता त्यांना मानसिक त्रास दिला जात आहे. 8) बदलापूर दुर्दैवी घटनेनंतर शासनाने महिला महाविद्यालये आणि शाळा यांमधील स्वच्छतागृहांच्या स्वच्छतेसाठी केवळ महिला स्वच्छता कर्मचारी नेमण्याचा कठोर आदेश दिला आहे. असे असतांना हिंदु महिला स्वच्छता कर्मचार्‍याला कामावरून काढून एका मुसलमान पुरुषाची मुलींच्या संस्थेत स्वच्छता कामगार म्हणून नेमणूक केली. ही गोष्ट विद्यार्थिनींच्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत गंभीर आणि प्रशासकीय हलगर्जीपणाची आहे.

9) प्रत्येक महिन्याला 4 दिवस शैक्षणिक कामकाज बंद ठेवून 150 विद्यार्थिनींकडून झाडणे, पुसणे आणि झुडपे तोडणे अशी कष्टाची कामे बलपूर्वक करून घेतले गेले. यात अनेक मुलींना इजा होणे, चक्कर येणे असे प्रकार घडले आहेत. एखादी मुलगी विरोधात बोलली, तर तिचा घरापर्यंत पाठलाग करून धमक्या दिल्या गेल्या. 10) तत्कालीन प्राचार्य अमर यांनी या अवैध कृत्यांना आळा घालण्याचा प्रयत्न केला असता रमेजा यांच्या पतीने त्यांना जिवे मारण्याची आणि अंगावर ट्रक घालण्याची धमकी दिली अन् त्यांना संस्थेतून हाकलून लावले. सध्या ज्या मुलींनी आवाज उठवला आहे, त्यांच्याविरुद्धही गुन्हे नोंदवण्याच्या धमक्या देऊन दबाव आणला जात आहे.

मुलींच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत 9 पेक्षा अधिक अभ्यासक्रम व्यवस्थित चालू आहेत. सौंदर्यवर्धन आणि शिवणकाम विभागाच्या 2 महिला कर्मचार्‍यांमधील अंतर्गत मतभेदांमुळे संस्थेची अपकीर्ती होत आहे. इतर विभागांतील विद्यार्थिनींच्या तक्रारी नाहीत; मात्र दोन विभागांतच तक्रारी आहेत.

या संदर्भात चौकशी करण्यासाठी पुणे उपसंचालक अनिल जाधव यांच्या विशेष पथकाने शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत चौकशी केली. या प्रकरणी सनातन प्रभातने अधिक माहिती घेण्यासाठी उपसंचालक अनिल जाधव यांना देखील संपर्क करण्याचा केला.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow