दक्षिणचे तीन धनवंत सीएम करोडपती, तर देवाभाऊ ६२ लाखांचे देणेकरी

देशातील ३१ मुख्यमंत्र्यांची संपत्ती किती?१४१३ कोटींचे डीके शिवकुमार टॉपर. त्यापाठोपाठ चंद्राबाबू आणि टी विजय! फडणवीसांची संपत्ती१३ कोटी

Jul 31, 2026 - 03:10
 0  1
दक्षिणचे तीन धनवंत सीएम करोडपती, तर देवाभाऊ ६२ लाखांचे देणेकरी

(विजयकुमार पिसे)
   सत्तेवर आल्यानंतर राज्यकर्त्यांची संपत्ती वाढते, असे एक निरीक्षण आहे. काहींचा अपवाद असू शकतो. आपल्या  देवाभाऊची संपत्ती १३कोटी असली तरी त्यांच्यावर ६२ लाखांचे देणे देखील आहे, अशी माहिती समोर आली. 
   असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (एडीआर) या संस्थेने देशातील ३१ मुख्यमंत्र्यांची संपत्ती किती? निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रांच्या आधारे जाहीर झाले आहे.
    राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतील मुख्यमंत्र्यांच्या संपत्तीचे आकडे डोळे विस्फारणारे आहेत. अलीकडेच दक्षिणेत दोन सीएमचे सत्तांतरण झाले, तमिळनाडूत टी.विजय आणि कर्नाटकात डी.के.शिवकुमार सीएम झाले. हे दोघेही अब्जाधीश आहेतच. 
  डीके देशातील टॉपर आहेत. त्यांच्याकडे तब्बल १४१२ कोटींची मालमत्ता आहे. त्यानंतर आंध्रचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचा क्रम लागतो. नायडू ९३२ कोटींचे धनी तमीळनाडूचे टी विजय ६४८ कोटींचे मालक आहेत. अरुणाचलचे सीएम पेमा खांडू ३३२कोटी रुपयांचे मानकरी आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात शेती हा व्यवसाय नमूद केला असून, त्यांच्याकडे १३.२७ कोटी रुपयांची मालमत्ता. शिवाय फडणवीस ६२ लाखांचे देणेकरी असल्याचे लक्ष वेधले आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow