Maid in Chaina रणगाड्याच्या स्फोटात सैनिकांच्या शरीराची चाळण

सैन्याचा सराव सुरू असताना भीषण स्फोट, दोन सैनिकांचा जागीच अंत

Sep 10, 2026 - 12:23
 0  2
Maid in Chaina रणगाड्याच्या स्फोटात सैनिकांच्या शरीराची चाळण

नवी दिल्ली : सैन्याचा सराव सुरू असताना मेड इन चायना रणगाड्याच्या  स्फोटात दोन जवान दगावले, तर अधिकारी गंभीर जखमी झाला आहे. स्फोट झालेला Typ 59 रणगाडा मेड इन चायना आहे.  अनेकांना चायना मॉडेलची भुरळ असते. परंतु सुरक्षा व्यवस्था किती पोखरलेली आहे, हे लक्षात येईल.
   बांग्लादेशातील चित्तगाँव भागात ही भीषण दुर्घटना असून चीनने दिलेल्या  रणगाड्यामधून फायरिंगचा सराव सुरू असताना स्फोट झाला. या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. त्या रणगाड्यात दोन सैनिक दिसत होते. 
  "द डेली"च्या वृत्तानुसार, स्फोटावेळी रणगाड्यात दोन सैनिक दिसत होते. त्यांचा मृत्यू झाला आहे. स्फोट झालेला Typ 59 चीनमध्ये विकसित करण्यात आला आहे. स्फोट तांत्रिक की दारुगोळ्याशी संबंधित या कारणांचा तपास सुरू आहे.  याबद्दल अद्याप कोणतीही स्पष्टता नाही. या स्फोटामुळे मेड इन चायनाच्या गुणवत्तेबद्दल प्रश्‍नचिन्ह निर्माण होणे साहजिक आहे. म्हणून... भारतीयांनो Maid in Indiaचा अवलंब करूया.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow