महाराष्ट्राचे भूमीपुत्र गोविंद देव गिरी महाराज राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र न्यासचे सरचिटणीस
सीईओ एअर मार्शल जितेंद्र मिश्रा, महेश भागचंदका कोषाध्यक्ष, अॅड.मदन मोहन पांडे, श्रीमती निर्मला यादव नवीन विश्वस्त. ट्रस्टमध्ये हिंदू समाजातील विविध घटकांना प्रतिनिधित्व
(विजयकुमार पिसे)
अयोध्या : अयोध्येत बुधवारी २ सप्टेंबर रोजी श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र न्यासच्या महत्त्वपूर्ण बैठकीत आपल्या सर्वांसाठी आनंदाची बाब, विशेषत: महाराष्ट्रवासीयांसाठी पूजनीय गोविंद देव गिरी जी महाराज आता श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र न्यासाचे सरचिटणीस म्हणून कार्यभार सांभाळणार आहेत. गोविंद देव गिरी जी महाराज महाराष्ट्राचे भूमीपुत्र, अहिल्यानगर जिल्ह्यातील आहेत.
त्यामुळे श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र न्यासाचे सरचिटणीसपदाची जबाबदारी मिळाल्याबद्दल पूजनीय गोविंद देव गिरी जी महाराज यांना विश्व हिंदू परिषदेच्यावतीने आदरपूर्वक शुभेच्छा. यासंदर्भात श्री आलोक कुमार जी (ज्येष्ठ अधिवक्ता आणि आंतरराष्ट्रीय अध्यक्ष) यांनी निवेदन जारी केले आहे. आलोककुमारजी निवेदनात म्हणतात, आम्हाला विश्वास आहे की, त्यांचे नेतृत्व आपल्या सर्वांसाठी मार्गदर्शक ठरेल. श्री महेश भागचंदका हे श्री राम जन्मभूमी आंदोलनातील एक अग्रगण्य कार्यकर्ते राहिले आहेत. आजही ते श्री अशोक सिंघल फाउंडेशनच्या माध्यमातून पूजनीय श्री अशोक सिंघल यांचे कार्य आणि हिंदुत्वाचा उद्देश पुढे नेत आहेत. विश्वस्त आणि कोषाध्यक्ष म्हणून त्यांची भूमिका संस्थेसाठी अत्यंत फायदेशीर ठरेल.
अधिवक्ता श्री मदन मोहन पांडे हे श्री राम जन्मभूमीच्या कायदेशीर लढ्यात एक समर्पित वकील म्हणून कार्यरत राहिले आहेत. श्रीराम जन्मभूमी खटला जिंकण्यात त्यांच्या तपस्येने महत्त्वाची भूमिका बजावली होती. आता, विश्वस्त म्हणून त्यांची नियुक्ती झाल्यामुळे त्यांच्या कायदेशीर जाणिवेचा आणि अनुभवाचा न्यासाला मोठा लाभ होईल. श्रीमती निर्मला यादव या देखील नव्या विश्वस्त झाल्या आहेत. यामुळे न्यासमध्ये हिंदू समाजातील विविध घटकांचे प्रतिनिधित्व सुनिश्चित झाले आहे. ही नियुक्ती नारीशक्ती प्रती असलेल्या आदराचेही प्रतीक आहे.
सीतारामजींच्या या पवित्र भूमीवर सुरू असलेल्या कार्यात महिलांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे; त्यांच्या समावेशामुळे ट्रस्टच्या उपक्रमांमध्ये संवेदनशीलता, दूरदृष्टी आणि सर्वसमावेशकता यांचा एक नवा आयाम प्राप्त होईल. मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) यांची नियुक्ती: ट्रस्टने एअर मार्शल श्री. जितेंद्र मिश्रा यांची मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. ते अत्यंत वरिष्ठ, प्रतिष्ठित आणि अनुभवी व्यक्तिमत्त्व आहेत. त्यांच्या अफाट अनुभवामुळे ट्रस्टचे कामकाज अधिक प्रभावी आणि पारदर्शक होईल. आम्ही त्यांचेही मनःपूर्वक अभिनंदन करतो. विश्व हिंदू परिषदेला पूर्ण विश्वास आहे की, या अनुभवी सदस्यांच्या समावेशामुळे न्यास भव्य श्री राम मंदिराचे काम अधिक कार्यक्षमतेने पूर्ण करेल आणि अयोध्येतून राम-राज्याचा मार्ग प्रशस्त करेल.जय श्री राम!
महाराष्ट्राचे भूमीपुत्र तथा न्यासाचे नवनियुक्त सरचिटणीस मा.गोविंद देव गिरी जी महाराज आणि अन्य विश्वस्त आणि सीईओ यांचे लक्ष्यवेध परिवारच्या वतीने मन:पूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा
What's Your Reaction?