जनसेवेलाच वाढदिवसाची भेट!
भाजपचे नेते, प्रभाग क्र. ४ चे कार्यकुशल नगरसेवक, मराठा समाजाचे नेते आणि धुरंधर लोकप्रतिनिधी मा. अनंत (नेता) जाधव यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!
वाढदिवसानिमित्त समाजोपयोगी उपक्रमांची अनोखी मेजवानी आयोजित करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांसाठी एलसीडी रायटिंग टॅबलेटचे मोफत वाटप, शालेय साहित्य वितरण, वृक्षारोपण, भव्य रक्तदान शिबिर, अनाथाश्रमातील बालकांसाठी भोजन, तसेच महिला सन्मान योजनेच्या कार्ड नोंदणीसह विविध लोकहिताचे कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत.
याच पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ४ मधील सर्व नागरिक, मित्रपरिवार आणि कार्यकर्त्यांच्या वतीने मा. अनंत (नेता) जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.
- दिनांक: ४ जुलै (शनिवार)
- वेळ: सायंकाळी ७.०० वाजता
- स्थळ: मा. अनंत (नेता) जाधव संपर्क कार्यालयाजवळ, मराठा वस्ती, सोलापूर
या प्रसंगी सर्व नागरिक, हितचिंतक, मित्रपरिवार व अनंत नेता प्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शुभेच्छांचा वर्षाव करावा, असे आवाहन अनंत नेता जाधव मित्रपरिवार यांच्या वतीने करण्यात आले आहे.
What's Your Reaction?