उत्तर प्रदेशात ट्विस्ट; २०१४ चा वंचित, एमआयएम पॅटर्न

...ओवैसी-आझाद यांचा तिसरा मोर्चाचा चमत्कार, महाराष्ट्रात २०१४ मध्ये त्यांना नॅनो-बाईक केले; २०२७:यूपीत स.पा. काँग्रेसचे काय होईल?

Nov 13, 2026 - 01:11
 0  16
उत्तर प्रदेशात ट्विस्ट; २०१४ चा वंचित, एमआयएम पॅटर्न

(विजयकुमार पिसे)
लखनौ : असदुद्दीन ओवेसी यांच्या नेतृत्वाखालील AIMIM आणि चंद्रशेखर आझाद यांच्या आझाद समाज पार्टी (ASP) यांनी २०२७ च्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी युतीची घोषणा केली आहे. या तिसरा मोर्चामुळे यूपीत ट्विस्ट निर्माण झाला आहे. हा तिसरा मोर्चा म्हणजे महाराष्ट्रातील २०१४ चा पॅटर्न नसेल? प्रकाश आंबेडकरांची वंचित आघाडी आणि एमआयएम यांच्या युतीने तेव्हा (भाजपा/सेना) महायुतीचा मार्ग प्रशस्त केला होता. एनसीपी ४ (नॅनो) आणि काँग्रेस २ (बाईक) अशी अवस्था केली होती. केवळ ६ जागा यांनी जिंकल्या.
   त्या पृष्ठभूमीवर यूपीतील या नव्या मोर्चाची घोषणा ओवैसी, चंद्रशेखर आझाद यांनी आज  केली. तिसऱ्या मोर्चाचे वैशिष्ट्ये म्हणजे आझाद यांना सीएमचा चेहरा म्हणून प्रोजेक्ट  केला जाईल. नव्या मोर्चाला 'सामाजिक परिवर्तन मोर्चा' असे नाव देण्यात आले आहे. विशेष म्हणजे असदुद्दीन ओवेसी यांनीच आझाद समाज पार्टीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांना मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून घोषित करून आश्चर्याचा धक्का दिला आहे. तसेच जागावाटप आणि रणनीतीमध्ये हा मोर्चा उत्तर प्रदेशातील सर्व ४०३ जागांवर निवडणूक लढवणार आहे. प्रामुख्याने मुस्लिम आणि दलित बहुल असलेल्या पश्चिम उत्तर प्रदेश व रोहिलखंड भागावर यांचा भर आहे.
  राजकीय समीकरणे पाहता राजकीय विश्लेषकांच्या मते, यामुळे समाजवादी पक्ष (SP) आणि काँग्रेसच्या मतांची विभागणी होऊन याचा अप्रत्यक्ष फायदा भारतीय जनता पक्षाला होऊ शकतो. दरम्यान मायावतींच्या बसपाने अजून पत्ते उघडलेले नाहीत. 
  @पाहू या पुढील वर्षीच्या २०२७ मध्ये देशातील सर्वात मोठ्या राज्याच्या निवडणुकीत काय चमत्कार होणार आहे. ज्याचा परिणाम कदाचित २०२९ च्या लोकसभेवर होऊ शकेल.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow