गहिनीनाथ महाराज औसेकर यांना ‘श्री विठ्ठल सेवा रत्न’ पुरस्काराने सन्मानित
अध्यात्म, वारकरी संप्रदाय आणि समाजप्रबोधन क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेत ह.भ.प. सद्गुरू गहिनीनाथ महाराज औसेकर यांना अखिल भारतीय वीरशैव लिंगायत महासभेच्या वतीने ‘श्री विठ्ठल सेवा रत्न’ पुरस्काराने गौरविण्यात आले. मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे काशी जगद्गुरू डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांच्या हस्ते हा सन्मान प्रदान करण्यात आला.
लातूर | प्रतिनिधी
अध्यात्म, वारकरी सांप्रदाय आणि समाजप्रबोधनाच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे ह.भ.प. श्री सद्गुरू गहिनीनाथ महाराज औसेकर यांना अखिल भारतीय वीरशैव लिंगायत महासभेच्या वतीने ‘श्री विठ्ठल सेवा रत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे आयोजित भव्य सोहळ्यात काशी जगद्गुरू डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांच्या हस्ते या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
ह.भ.प. सद्गगुरू गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी वारकरी सांप्रदायाच्या माध्यमातून अध्यात्मिक विचारांचा प्रसार व समाज प्रबोधनाचे कार्य केले आहे. त्यांच्या या कार्याचा सन्मान म्हणून महासभेने त्यांना ‘श्री विठ्ठल सेवा रत्न’ पुरस्कार जाहीर केला. पुरस्कार मिळाल्याने हैदराबाद, पुणे, सोलापूर, लातूर, धाराशिव तसेच मराठवाडय़ातील वारकरी आणि भाविक व भक्तांचे वतीने त्यांचे अभिनंदन होत आहे.
या गौरव सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी कर्नाटकचे ग्राम विकास व पंचायत राज मंत्री तथा अखिल भारतीय वीरशैव लिंगायत महासभेचे अध्यक्ष ईश्वर बी. खंड्रे होते. यावेळी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर, महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, आ.प्रवीण स्वामी, माजी आ. विश्वनाथ चाकोते, मीनाताई नाईक आदी मान्यवर उपस्थित होते.
गहिनीनाथ महाराजांचा सन्मान अभिमानाची बाब
गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या अध्यात्मिक व सामाजिक कार्याची दखल राष्ट्रीय पातळीवरील संस्थेने घेतल्याने त्यांच्या कार्याला नवी ओळख मिळाली आहे. त्यांच्या या सन्मानामुळे वारकरी संप्रदाय आणि भक्तिमार्गाशी जोडलेल्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
लक्ष्यवेध परिवारचे वतीने सद्गगुरू श्री गहिनीनाथ महाराज यांचे मनःपूर्वक अभिनंदन
What's Your Reaction?