भारतीय नारी,पाकड्यांवर भारी!
टी-20 मध्ये विजयाचा श्रीगणेशा;टी-20 वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानला लोळवले,पहिल्याच सामन्यात 64 धावांनी विजय
मुंबई : रविवारपासून मुंबईत झालेल्या टी-20 वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात भारताने पाकिस्तानचा 64 धावांनी पराभव करून विजय मिळवला. यानिमित्ताने भारतीय नारी, पाकड्यांवर भारी ठरली आहे. केवळ पुरुष क्रिकेटपटूच पाकला दणका देतात असे नव्हे, महिला क्रिकेटपटूंनीही धमक दाखवून दिली आहे.
टी-20 वर्ल्ड कपमधील भारताने पाकिस्तानचा 64 धावांनी पराभव करत पहिला विजय मिळवत विजयाचा श्रीगणेशा केला आहे. भारताच्या वाघिणींनी आत्मविश्वासाने खेळ केला आणि पाकिस्तानवर दबाव टाकत सामना खेचून आणला. यावेळी अष्टपैलू खेळाडू दीप्ती शर्माने पाच विकेट आणि एक रन आऊट करत पाकविरुध्दचा सामना फिरवला. दीप्ती सामन्याची गेमचेंजर ठरली. या सामन्यात भारतीय संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना 20 ओव्हरमध्ये 170-6 धावा केल्या होत्या. यामध्ये स्मृती मानधना हिने 44 चेंडूत 68 धावांची महत्त्वाची अर्धशतकी खेळी केली. तर रिचा घोषने शेवटला 36 धावांची तुफानी खेळी केली होती. मात्र धावांचा पाठलाग करताना पाकिस्तान संघाला 106 धावांवर ऑल आऊट केले. पाकिस्तानकडून मुनीबा अली हिने सर्वाधिक 41 धावांची खेळी केली.
भारताने प्रथम फलंदाजी करताना पहिल्याच चेंडूवर शफालीने षटकार मारत आक्रमक सुरूवात केली होती. मात्र त्याच षटकात पाचव्या चेंडूवर परत एकदा मोठा फटका मारण्याच्या नादात बाद झाली. स्मृती मानधना आणि हरमनप्रीत कौर या दोघींनी63 चेंडूत 91 धावांची भागीदारी करत डाव सावरला. रिचा घोषने 17 चेंडूत 34 धावांची खेळी करत भारताला 170 पर्यंत पोहोचवले.
पाकिस्तान संंघातील गुल फिरोजा आणि मुनीबा अली 38 धावांची सलामी दिली होती. दीप्तीने ही जोडी फोडली. आयशा जफरलाही दीप्तीने माघारी पाठवले. त्यानंतर पाकिस्तानचा डाव सावरला नाही. एकटी मुनीबा मैदानात उभी होती पण एक चोरटी धाव घेताना मुनीबाला दीप्तीने रन आऊट करून सामना फिरवला. या विजयासह भारतीय संघाने ग्रुप ए मध्ये दुसर्या स्थानी झेप घेतली आहे. पहिल्या स्थानी ऑस्ट्रेलिया आहे. भारतीय संघाचा आता पुढचा सामना नेदरलँडविरूद्ध 17 जूनला आहे.
What's Your Reaction?