जिंकणार तर राऊतच! ६००,१००,१६ पासून मतमोजणी
पालकमंत्री: २०० पेक्षा अधिक मताधिक्क्य; भाजपाचा व्हीप
सोलापूर : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत भाजपाचे महायुतीचे बाहुबली मताधिक्य असल्यामुळे जिंकणार तर बार्शीचे राजेंद्र राऊतच. पण एकूण मताध़िक्क्य ६०० पेक्षा अधिक, सोलापूर मनपात १०० पार तर श.प.गटाचे वसंत देशमुख यांची गिनती १६ पेक्षा पुढे की कमी इतकीच उत्सुकता राहणार आहे.
दरम्यान पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी मंगळवारी पत्र परिषदेत२०० पेक्षा अधिक़ मतांनी राऊत विजयी होतील, असा दावा केला आहे. तसेच भाजपा नगसेवकांसाठी पक्षाने व्हीप जारी केला आहे. नगरसेवक, सभापती आणि जि.प.सदस्य मतदारांची उत्सुकता लक्ष्मी दर्शनाची आहे. त्यांच्या 'money' अजून वसंत फुललेला दिसत नाही. त्यामुळेे या 'मनी' वरही निवडणुकीत चुरस दिसेल अशी चर्चा आहे.
उमेदवारी अर्ज भरण्यापासून माघारपर्यंतच्या काळात भाजपाकडून बिनविरोध निवडणुकीची चर्चा आणि टोकाचे प्रयत्न झाले. पण ही प्रक्रिया जाहीरपणे आणि अटीतटीने झाली. ती गुपचूप न केल्यामुळे विरोधक सावध झाले आणि अविरोधचे प्रयत्न फसले. विरोधक़ भलतेच सावध राहून त्यांनी गुपचूप खेळी करत काही उमेदवारी अर्ज बाद झाले, काही जणांनी माघार घेतली तरी अकलूजकरांनी वसंतराव देशमुखांचा अर्ज कायम ठेवून मतदारांच्या 'मनी वसंत फुलवला. विरोधकांची पडद्याआडची खेळी प्रारंभीच्या निवडणूक लढाईपर्यंत यशस्वी ठरली. त्यांना जिंकण्याची खात्री नाही, मात्र निवडणूक बिनविरोध करता आली नाही, आणि देशमुखांना किती मते मिळतात, इतकीच त्यांची मर्यादित व्यूहरचना आहे.
विधान परिषद निवडणुकीची सारी मदार पालकमंत्र्यांकडे आहे. गोरे यांच्या टीममध्ये आ.सचिन कल्याणशेट्टी, आ.देवेंद्र कोठे आणि शहर ग्रामीणचे दोन्ही अध्यक्ष तडवळकर, चव्हाण आहेत. यासंदर्भात मंगळवारी १६जून रोजी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजपा उमेदवार राजेंद्र राऊत निर्धारित मतांपेक्षा २००पेक्षा मते अधिक़ घेतील, असा दावा केला. तसेच महायुतीमध्ये शिंदे सेना, अजीतदादांचा पक्ष आहेच. शिवाय विरोधी श.प.व काँग्रेस, उबाठा व अन्य पक्षांचीही मते मिळतील, अशी खात्री आहे. निवडणुकीस अनुसरून भाजपा नगरसेवकांसाठी पक्षाने व्हीप बजावलेला आहे असेही पालकमंत्री गोरे म्हणाले.
What's Your Reaction?