सर्वाचेच अंदाज चुकले, असा हा "विजय!"
तमिळनाडूत सुपर वॉशिंग मशिन! काँग्रेस राहुलजीचे ऐकेल तर?
(विजयकुमार पिसे)
बंगाल, तमिळनाडू,केरळम् हे तीनही प्रांत प्रादेशिक भाषा प्रभुत्व. राष्ट्रीय भाषा व राष्ट्रीयकरण वर्ज्य. बंगालमध्ये १५ वर्ष तर तामिळनाडू व केरळम् येथे १० वर्षानंतर सत्तांतर म्हणजे सुपर वॉशिंग मशिन होय. तामिळनाडूत सर्वांचेच अंदाज चुकवणारा विजय टीव्हीकेच्या थलपती यांना मिळाला आहे. केरळम् राज्यात सत्तांतराची पंचवार्षिक योजना एक जादा टप्पा घेतली आहे.
संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या तामिळनाडू विधानसभा निवडणूक निकालात तामिळी सुपरस्टार अभिनेता थलपती विजय यांच्या टीव्हीके पक्षाने बाजी मारली आहे. थलपती विजय निवडणुकीत किंगमेकरची भूमिका बजावेल, असे सर्वांनाच वाटत होते. परंतु निवडणूक निकालानंतर डीएमके आणि एआयएडीएमके यांना मागे सारून थलपती विजय किंग असल्याचे स्पष्ट झाले आहे. सर्वसामान्य लोकांना उमेदवारी, जनतेला केंद्रस्थानी ठेवून केलेल्या घोषणा, प्रचारातील अत्याधुनिक तंत्रज्ञान आदी मुद्द्यांमुळे घराघरात पोहोचलेल्या टीव्हीके पक्ष तामिळी जनतेच्या पसंतीस उतरला आहे.
१९६७ नंतर पहिल्यांदाच तामिळनाडूत डीएमके किंवा एआयएडीएमके शिवाय दुसऱ्या पक्षाची सत्ता आली आहे. अधोरेखित करण्यासारखी बाब म्हणजे ज्या काँग्रेस पक्षाचे १४ आमदार तामिळनाडूत होते, त्यांची ४ वर घसरगुंडी झाली आहे. राहुल गांधी यांचे मत अव्हेरले हे त्याचे उदाहरण. स्थानिक काँग्रेस नेत्यांची मनमानी झाली. महाराष्ट्रातही काँग्रेसने अशीच चूक केली, तीच तामिळनाडूत.
द्रविड मुन्नेत्र कळघम अर्थात डीएमके पक्षासोबत अंतर राखून आपण थलपतीच्या टीव्हीकेबरोबर जायला हवे, असा आग्रह काँग्रेसच्या काही स्थानिक नेत्यांनी राहुल गांधी यांच्याकडे धरला होता. राहुल गांधी यांनाही विजय थलपती यांच्याबद्दल अनुकूलता होती. तसेच विजय तामिळनाडूची गणिते बदलू शकतो, असे राहुल गांधी यांनाही वाटत होते.
एका बैठकीत राहुल गांधी यांनी टीव्हीके सोबत जाण्याचा प्रस्ताव काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांसमोर ठेवला. परंतु ज्येष्ठ नेते, माजी गृहमंत्री पी.चिदंबरम आणि काही स्थानिक नेत्यांनी थलपती विजयबरोबर जायला नको, डीएमकेबरोबर राहून आपण आपल्या जागा वाढवू शकतो, असा दावा केला. काँग्रेसच्या नेत्यांच्या अतिउत्साहाने राहुल गांधीना माघार घेणे भाग पडले.
महाराष्ट्रातही असाच प्रकार घडला. ठाकरेंच्या शिवसेने बरोबर जायला नको, असे मत राहुल गांधींचे होते. मात्र काँग्रेस नेत्यांनी राहुल गांधी यांना ठाकरेंच्या शिवसेनेसोबत जाणेस भाग पाडले. नंतर राज्यात विधानसभेला काँग्रेसची वाताहात झाली. तसेच सेनेसारख्या हिंदुत्ववादी पक्षासोबत गेल्याने काँग्रेसवर बरीच टीकाही झाली. महाराष्ट्रात काँग्रेस नेत्यांनी राहुल गांधी यांचे ऐकले असते तर.
तामिळनाडूतही राहुल गांधी यांचे मत काँग्रेसच्या नेत्यांनी लक्षात घेतले असते तर. जर राहुल गांधी यांच्या म्हणण्यांनुसार काँग्रेस टीव्हीकेबरोबर विजयसोबत गेली असती तर काँग्रेस तामिळनाडूत सत्तेचा वाटेकरी झाला असता.
प्रस्थापित पक्षांपासून आपल्या टीव्हीके पक्षाला थलपती विजयनी दूर ठेवले. एआयएडीएमके सोबत युती करण्यासाठी त्यांच्यावर भारतीय जनता पक्षाचा दबाब होता. तसेच आपण काँग्रेससोबत गेलो पाहिजे, असे टीव्हीकेच्या कार्यकर्त्यांना वाटत होते. त्यांनी निवडणूक लागायच्या आधी विजयकडे काँग्रेस बरोबर जाण्यासाठी आग्रह धरला. त्यावर उत्तर देताना मी राहुल गांधी यांना पसंत करतो, त्यांचे नेतृत्व मला आवडते, असे विजयने सांगितले. राहुल गांधी यांच्याशी थलपती यांचा चांगला सबंधंही आहे. पण निवडणूक काळात थेटपणे युती करण्याबाबत विजय साशंक होता. प्रस्थापित पक्षांसोबत थेटपणे युती आघाडी न करणे विजय थलपती यांच्या पथ्यावरच पडले आहे.
What's Your Reaction?