निदा खान सापडली; टीसीएस धर्मांतरण,लैंगिक छळाचा छडा लागणार!

निदाचा ४० दिवसांपासून गुंगारा,एमआयएम नगरसेवकाने दिला आश्रय, आंतरराष्ट्रीय सिंडिकेटचा संशय

May 8, 2026 - 21:20
 0  342
निदा खान सापडली; टीसीएस धर्मांतरण,लैंगिक छळाचा छडा लागणार!

(विजयकुमार पिसे)

 नाशिक येथील बहुचर्चित टीसीएस (TCS) धर्मांतर आणि लैंगिक छळ प्रकरणातील मुख्य सूत्रधार आणि कंपनीची माजी एचआर निदा खान अखेर सापडलीच. ४० दिवस तिने पोलिसांना गुंगारा दिला. एमआयएम नगरसेवक मतीन पटेलने निदा खानला छ.संभाजीनगर येथे आश्रय दिला होता. नाशिक पोलिसांना कुणकुण लागल्यानंतर त्यांनी संभाजीनगरमध्ये तिच्या मुसक्या आवळल्या. यामुळे मतीनवरही गुन्हा दाखल केला आहे.

    छ. संभाजीनगरात एका निर्जन ठिकाणी लपली होती, तिथे पोलिसांसाठी आव्हान होते. निदा स्वतःला वाचवण्यासाठी एक ठिकाण खास होतं. ज्या इमारतीपासून एकही घर नव्हतं. वर्दळ नाही, निर्जन परिसर असल्याने कोणाला संशय येण्याची शक्यताच नव्हती. अशा ठिकाणी निदा आश्रयाला होती. मात्र पोलिसांनी तिचा अखेर छडा लावला. 

   निदा खान आपल्या कुटुंबासह (आई, वडील, भाऊ आणि आत्या) नारेगावच्या एका फ्लॅटमध्ये वास्तव्यास होती. नाशिक एसआयटी पथकाला तांत्रिक तपासाद्वारे ती येथे असल्याची खात्री पटल्यावर दोन दिवस पाळत ठेवली. नाशिक आणि संभाजीनगर पोलिसांच्या संयुक्त पथकाने मध्यरात्री धाड टाकून निदा खानला बेड्या ठोकल्या.

   गुंगारा देणेसाठी ती गरोदर असल्याचे सांगत, वैद्यकीय प्रमाणपत्राद्वारे अटकपूर्व जामिनाचा प्रयत्नही अपयशी ठरला. त्यावेळी न्यायालयाने एका आंतरराष्ट्रीय सिंडिकेट यामागे आहे, असे निरीक्षण नोंदवून तिचा जामीन फेटाळला. त्यानंतर तीनच दिवसांत ही कारवाई झाली आहे. निदा खानच्या अटकेनंतर नाशिक धर्मांतर प्रकरणात आणखी काय खुलासे समोर येतील हे तपासाअंती कळेल.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow