तावडेंवर भरवसा, महाराष्ट्राच्या हातात उत्तर प्रदेशची कमान
लोकसभेच्या सेमी फायनलमध्ये भाजपाची परीक्षा, नितीन नबीन यांच्या टीममध्ये महाराष्ट्राचा पंच, अमित शाह यांनी २०१४ मध्ये जो चमत्कार केला, तीच अपेक्षा
नवी दिल्ली : २०१४ मध्ये मोदींना राष्ट्रीय राजकारणात आणताना अमित शाह यांनी उत्तर प्रदेशात कमाल केली होती, आता ही धुरा महाराष्ट्रावर सोपविली असून विनोद तावडेंवर पक्षश्रेष्ठींचा भरवसा आहे. २०२७ मध्ये होणारी विधानसभेची निवडणूक ही लोकसभेची सेमी फायनल ठरणार आहे.
भाजपाच्या नव्या राष्ट्रीय कार्यकारिणीची घोषणा काल अध्यक्ष नितीन नबीन यांनी केली. यामध्ये महाराष्ट्रातून पाच जण आहेत. विनोद तावडे राष्ट्रीय महामंत्री आहेत. उत्तर प्रदेशसह पंजाब, उत्तराखंड आणि इतर राज्यांच्या विधानसभा निवडणुका आणि २०२९ ची लोकसभा निवडणूक या पार्श्वभूमीवर भाजपकडून नवी राष्ट्रीय कार्यकारिणीत कोण याची उत्सुकता होती. शिवाय जंतर मंतर जेन झी याचाही अंदाज बांधला होता.
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत १३ राष्ट्रीय उपाध्यक्ष आणि ८ राष्ट्रीय सरचिटणीस आहेत. उपाध्यक्षांच्या यादीत महाराष्ट्रातील दिंडोरीच्या माजी खासदार व केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनाही स्थान दिले आहे. याशिवाय पक्षाच्या तिजोरीची चावी केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांच्यावर सोपविली आहे. तसेच सह संघटनमंत्री शिवप्रकाश आणि प्रीती गांधी असे पाच जण महाराष्ट्राचे आहेत. त्यामुळे महाराष्ट्राची जबाबदारी वाढली आहे.
What's Your Reaction?