बार्शीत वराह जयंतीची विश्व हिंदू परिषद वतीने भव्य मिरवणूक

Gen- Z चा मोठा सहभाग, पारंपरिक वाद्ये, हलग्या, संबळाचा निनाद आणि प्रचंड जयघोष

Sep 22, 2026 - 00:25
 0  4
बार्शीत वराह जयंतीची विश्व हिंदू परिषद वतीने भव्य मिरवणूक

बार्शी : विश्व हिंदू षरिषद व बजरंग दलाच्या वतीने बार्शी शहरात भगवान वराह स्वामी जयंतीची रविवारी भव्य मिरवणूक काढण्यात आली. Gen-Z चा मोठा सहभाग या मिरवणुकीची विशेषतः होती. पारंपरिक वाद्ये, हलग्यांचा खणखणाट व संबळाच्या निनादात भव्य मिरवणूक मोठ्या उत्साहात संपन्न झाली.

   या मिरवणुकीचे आणखी एक विशेष आकर्षण म्हणजे श्री भगवान वराह स्वामींची मनमोहक मूर्ती लक्ष्य वेधून घेणारी होती. आणि त्या मूर्तीची मोठी चर्चा होती. प्रचंड संख्येनी उपस्थित भक्तांनी जोरदार घोषणाबाजी व जल्लोष केला. तसेच 

श्री भगवान वराह स्वामींच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी देखील केली होती.

    या मिरवणुकीची सुरूवात श्री भगवंत मंदिर मार्ग येथे विश्व हिंदू परिषद सोलापूर जिल्ह्याचे जिल्हा सहमंत्री बापूसाहेब कदम,बार्शीचे प्रखंड मंत्री अमर शुक्ला, बार्शी बजरंग दलाचे संयोजक शिरीष जाधव, महेश गुरव महाराज यांच्या शुभहस्ते महाआरतीने झाली.

   ही भव्य मिरवणूक पुढे महाद्वार चौक, वीर सावरकर चौक,पटेल चौक, पान खुंट,ऐनापूर मारूती चौक, शाहिर अमर शेख चौक, पांडे चौक मार्गे शिव सृष्टी ह्या पारंपारिक मार्गाने काढण्यात आली. मिरवणुकीची सांगता, बार्शीचे विद्यमान नगरसेवक विजय राऊत यांच्या उपस्थितीत झाली.

    मिरवणुकीचे वैशिष्ट्ये म्हणजे,कर्कश्श डीजे व डाॅल्बीला फाटा देऊन, पारंपरिक हलगी व संबळाचा निनाद होता. मिरवणुकीत सहभागी तरुणाई व भाविक भक्तांच्या व मिरवणूक पाहणाऱ्या नागरिकांच्या चेहऱ्यावर उत्साह ओसंडून दिसत होता. मिरवणूक यशस्वी करण्यासाठी विश्व हिंदू परिषद व बजरंग दल बार्शी प्रखंडाच्या पदाधिकाऱ्यांनी, बजरंगी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. मिरवणुकीच्या दरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून बार्शीच्या पोलिस अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow