नवरात्रात गरबा, रास कार्यक्रमात जिहाद्यांना प्रवेश नको : बजरंग दल
पोलीस आयुक्त, अधीक्षकांना निवेदन; जिहादींकडून ओळख लपवून गरब्यात तरुणींना लव्ह जिहादच्या जाळ्यात फसवण्याचा प्रयत्न
सोलापूर : शारदीय नवरात्र महोत्सव कालावधीत सार्वजनिक नवरात्र महोत्सव मंडळात दुर्गाशक्ती जागरण रास गरबा कार्यक्रमाम जिहादी प्रवृत्ती आपली मूळ ओळख लपवून तरुणींना लव्ह जिहादच्या जाळ्यात फसवण्याचा प्रयत्न करतात, त्यांना प्रतिबंध करण्याची मागणी विश्व हिंदू परिषद बजरंग दलाने पोलीस आयुक्त व पोलीस अधीक्षक़ यांना निवेदनाद्वारे केली आहे.
11 ते 20 ऑक्टोबर कालावधीमध्ये नवरात्र असून यावेळी विविध सेवाभावी संस्था, संघटनांकडून दुर्गाशक्ती जागरण रास गरबा कार्यक्रमांचे सामूहिकरीत्या आयोजन केले जाते. अशा कार्यक्रमाचा गैरफायदा घेऊन काही जिहादी वृत्ती मानसिकता असलेल्या व्यक्ती आपली मूळ ओळख लपवून सहभागी होतात. तरुणींना लव्ह जिहादच्या जाळ्यामध्ये फसवण्याचा प्रयत्न करतात. या संदर्भात सतर्कता म्हणून सर्व आयोजकांना अशा कार्यक्रमाच्या ठिकाणी अनधिकृत प्रवेश टाळणे तसेच सहभागी झालेल्या महिला व भगिनी यांच्याशी गैरवर्तन असा अनुचित प्रकार घडू नये, याबद्दल आयोजकांनी अशा कार्यक्रमांमध्ये प्रवेश देताना ओळखपत्र सक्तीचे करावे तसेच त्याची ओळख पटल्यावरच प्रवेश द्यावा. अनुचित घटना घडल्यास याची जबाबदारी आयोजकांवर राहील असे निर्देश काढण्याचे निवेदनसोलापूर शहर पोलिस उपायुक्त प्रीतम यावलकर तसेच पोलीस अधीक्षक यांना देण्यात आले आहे.
याप्रसंगी विहिंप सहमंत्री बाबू गिरगल, अभय कुलथे (बजरंग दल संयोजक), कृष्णा देशपांडे (साप्ताहिक मिलन प्रमुख)अविनाश कय्यावाले (गोरक्षक सहसंयोजक), आदित्य चिप्पा (बलोपासना प्रमुख) प्रज्वल बासुतकर (संयोजक मार्कंडेय महामुनी प्रखंड) अभिजीत कलबुर्गीवाले (संयोजक छ. शिवाजी महाराज प्रखंड), युवराज कल्लावाले (संयोजक माधव प्रखंड), लक्ष्मीनारायण चन्ना (सहसंयोजक मार्कंडेय महामुनी प्रखंड), आकाश सूर्यवंशी, प्रीतम कलबुर्गीवाले (गोरक्षक छ. शिवाजी महाराज प्रखंड) आदी विहिंप बजरंग दलाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
What's Your Reaction?