विश्‍व हिंदू परिषद हितचिंतक नोंदणी अभियानाचा शुभारंभ!

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्तेे पहिली नाेंंदणी

Nov 23, 2026 - 11:22
 0  34
विश्‍व हिंदू परिषद हितचिंतक नोंदणी अभियानाचा शुभारंभ!

पंढरपूर : कार्तिकी (प्रबोधिनी) एकादशीच्या पावन मुहूर्तावर विश्‍व हिंदू परिषद हितचिंतक नोंदणी अभियानाचा शुभारंभ महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा.ना.श्री. एकनाथजी शिंदे यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. तीर्थक्षेत्र पंढरपूर येथे श्रध्देय श्री देगलुरकर महाराज मठात वारकरी सांप्रदायातील उपस्थित अनेक श्रध्देय संत,महंत, ह.भ.प.महाराज यांचे आशीर्वाद विहिंपच्या हितचिंतक अभियानास लाभले. 21 नोव्हेंबर 2026 रोजी पहाटे 5.45 वा.ब्रह्म मुहूर्तावर अखिल भारतीय स्तरावर या हितचिंतक अभियानाची पहिली नोंदणी  पार पडली.
     याप्रसंगी राज्याचे रोहयो व फलोत्पादन मंत्री भरतशेठ गोगावले, आ.राजू खरे, आदरणीय चैतन्य महाराज देगलुरकर, चंद्रशेखर महाराज देगलुरकर, डॉ. महेश महाराज देहूकर, तीर्थक्षेत्र आळंदीचे योगी निरंजन नाथ महाराज, हभप राणा महाराज वासकर, मारुती महाराज तुणतुणे, अक्षय महाराज भोसले (शिवसेना अध्यात्मिक आघाडीचे प्रमुख), भाजप नगरसेवक सौरभ थिटे, विहिंप पंढरपूर जिल्हा अध्यक्ष डॉ.पारस राका, प्रांत सदस्य रवींद्र साळे, विहिंप विभाग मंत्री विजयकुमार पिसे (संपादक), विभाग सहमंत्री संजयकुमार जमादार, पंढरपूर जिल्हा सहमंत्री गोपाळ सुरवसे, जिल्हा उपाध्यक्षा रेखाताई टाक, अक्कलकोट बजरंग दल प्रखंड संयोजक मदन राठोड, दक्षिण सोलापूर प्रखंड सहमंत्री अजय गवसने,बजरंग दलाचे सुनील शिंदे, विनोद शिंदे तसेच केदारनाथ चंदेले आदी उपस्थित होते. 
    उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विहिंपच्या हितचिंतक अभियानास शुभेच्छा दिल्या.तसेच देशात धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात विश्‍व हिंदू परिषदेचे महत्व अनन्यसाधारण आहे. तसेच या अभियानाच्या माध्यमातून विहिंपचे कार्य अधिक व्यापक होईल. तसेच देश, देव, धर्म ही संकल्पना सर्व हिंदू समाजापर्यंत पोहोचेल, असा विश्‍वासही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला. ह.भ.प. चैतन्य महाराज देगलूरकर यांनी आपल्या आशीवर्चनात या अभियानातून विश्‍व हिंदू परिषदेच्या कार्याचा विस्तार होवो, अशा शुभकामना व्यक्त केल्या. विभागमंत्री विजयकुमार पिसे यांनी हितचिंतक अभियानाची माहिती व प्रास्ताविक केले. जिल्हा मंत्री डॉ. पारस राका आणि प्रांत सदस्य रवींद्र साळे यांनी मान्यवरांचे स्वागत केले. याप्रसंगी ह.भ.प.चैतन्य महाराज देगलूरकर, हभप मारुती महाराज तुणतुणे, योगी निरंजन नाथ महाराज, अक्षय महाराज भोसले, भाजपा नगरसेवक  सौरभ थिटे या मान्यवरांनीही आज पहिल्या दिवशी हितचिंतक अभियानात आपली नोंदणी केली.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow