जुळे सोलापुरात बसव जन्मोत्सव सोहळा
अनेक मान्यवरांची उपस्थिती, म.बसवेश्वर यांचा जागर
(विजयकुमार पिसे)
सोलापूर: जुळे सोलापूर मध्यवर्ती बसव जन्मोत्सव सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला.
याप्रसंगी म.बसवेश्वर प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्री. हत्तुरे मामा, माजी आमदार शिवशरण पाटील, समाधान हॉस्पिटलचे चेअरमन डॉ. मल्लिकार्जुन तरनल्ली, शिक्षण विस्तार अधिकारी भांजे, शिवा संघटनेचे राजकुमार मामा, उत्सव अध्यक्ष महेश इचगे आणि उपाध्यक्ष राहुल उपासे यांची प्रमुख उपस्थिती होती.
नागेश जाधव, बाळासाहेब बनसोडे, राहुल जाधव, दीपक माने, सुनील सुरगाळी, गौरीशंकर कलशेट्टी, श्रीकांत पाटील, धर्मराज नाशी, कौस्तुभ स्वामी, अविनाश बोधले, परमेश्वर माळगे, अजिंक्य उप्पीन आदी मान्यवरांचीही कार्यक्रमास हजेरी होती. यानिमित्ताने महात्मा बसवेश्वरांच्या विचारांचा जागर करण्यात आला. मोठ्या उत्साहाने सर्वांनी सहभाग नोंदवला. आयोजन शिस्तबद्ध पद्धतीने पार पडले. या परिसरात भक्तीमय आणि उत्सवी वातावरण निर्माण झाले होते.
What's Your Reaction?