सिहगडमध्ये ३२ महिने थकीत वेतन १५ दिवसांत द्याय! भा.म.संघाचा लढा

सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटीच्या कर्मचाऱ्यांचे ३२ महिन्यांपासून प्रलंबित असलेले वेतन, भविष्य निर्वाह निधी (PF) आणि अन्य प्रश्न मार्गी लावण्यासाठी भारतीय मजदूर संघाने पाठपुरावा केला. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासोबत झालेल्या बैठकीत संस्थेला १५ दिवसांत कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले. प्रश्न वेळेत न सुटल्यास कायदेशीर कारवाईचा इशाराही मंत्र्यांनी दिला.

Oct 16, 2026 - 01:19
 0  1
सिहगडमध्ये ३२ महिने थकीत वेतन १५ दिवसांत द्याय! भा.म.संघाचा लढा

पुणे : सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटी कर्मचाऱ्यांचे तब्बल ३२ महिने प्रलंबित वेतन, भविष्य निर्वाह निधी (PF) से प्रश्न मार्गी लावण्यासाठी भारतीय मजदूर संघाच्या पुढाकाराने लढा दिला. अंतिमतः या पार्श्वभूमीवर उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासमवेत भारतीय मजदूर संघाची बैठक झाली.
    या बैठकीत येत्या १५ दिवसांत कार्यवाही करण्याचे स्पष्ट निर्देश मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सिंहगड संस्थेला दिली. तसेच प्रश्नांची वेळेत सोडवणूक न झाल्यास संस्थेवर कायदेशीर कारवाईचा  इशाराही मंत्र्यांनी दिला.
    गेल्या अनेक महिन्यांपासून वेतन प्रलंबित असल्यामुळे कामगार आणि त्यांच्या कुटुंबीयांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. भविष्य निर्वाह निधी (PF) आणि अन्य प्रलंबित प्रश्नही सुटले नाहीत. यासाठी कामगारांनी आंदोलन व सत्याग्रहाच्या माध्यमातून आपला लढा सुरू ठेवला. भारतीय मजदूर संघाने पाठपुरावा केला आहे. व मंत्र्यांसोबतच्या बैठकीमुळे प्रलंबित प्रश्न सोडवणुकीच्या दृष्टीने पाऊल पडले आहे. 
    यावेळी भारतीय मजदूर संघाचे महाराष्ट्र प्रदेश संघटन सचिव बाळासाहेब भुजबळ म्हणाले, सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटीतील कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी भारतीय मजदूर संघ सातत्याने प्रयत्नशील आहे. ३२ महिन्यांपासून प्रलंबित असलेले वेतन, पीएफ आणि अन्य प्रश्न तातडीने निकाली निघणे आवश्यक आहे.
    या बैठकीस सिंहगडचे  संस्थापक अध्यक्ष एम एन नवले, संचालक प्रकाश पाटील, तंत्र शिक्षण विभागाचे संचालक प्रमोद नाईक, सहसंचालक डॉक्टर सुरेश पाटील, अवर सचिव अमोल मुत्याल, शैलेंद्र देवळणकर, डॉ.उबाळे मंत्रालयात उपस्थित होते. भारतीय मजदूर संघाच्या वतीने प्रदेश संघटन मंत्री बाळासाहेब भुजबळ, अनिकेत जाधव, कामगार प्रतिनिधी औदुंबर ताठे, शुभम फाळके व भा.म.संघाचे पदाधिकारी यांचीही प्रमुख उपस्थित होती. 
    कामगारांचे प्रलंबित वेतन, पीएफ आणि अन्य प्रलंबित प्रश्न प्रत्यक्ष निकाली निघेपर्यंत भारतीय मजदूर संघाचा संघर्ष सुरूच राहणार असल्याचा निर्धार भारतीय मजदूर संघ महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष सचिन मेंगाळे यांनी व्यक्त केला आहे .

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow