अक्कलकोटमध्ये देवाचा बुलडोझर चालला; कमलीवाले बाबा दर्गा व शहा हुसेनी दर्गा परिसरात अतिक्रमणावर जेसीबी
महाराष्ट्रात जिहादी अतिक्रमणांवर फडणवीसांच्या देवाचा बुलडोझर चालतोय, एकाच दिवशी अक्कलकोट, संभाजीनगर येथे अतिक्रमण हटाव मोहीम
(विजयकुमार पिसे)
मुंबई : यूपीमधील बुलडोझर बाबाची जशी चर्चा, तशी महाराष्ट्रात होत नाही. पण फडणवीसांच्या देवाभाऊचा बुलडोझर आता थांबायचे नाव घेत नाही. काल महाराष्ट्रात स्वामी समर्थांच्या नगरीत अक्कलकोट आणि छ. संभाजीनगरात दोन ठिकाणी एकाच वेळी जिहादी अतिक्रमणांवर बुलडोझर चालला. ही कारवाई अद्याप पर्यंत माध्यमं, मिडिया आणि चॅनलवाल्यांनी ओपन केली नाही, त्यांचं लक्ष फक्त जंतर मंतर आहे. असो..
जिहादींचेे अतिक्रमण हटाव मोहीम फत्ते करताना गृहखाते याच पत्ताही लागू देत नाहीत. ही खासीयत 'देवा'च्या बुलडोझरची आहे. शासकीय जागांवर कब्जा करून त्यावर दर्गा, थडगे अनेक ठिकाणी उभे आहेत. अक्कलकोट नवीन तहसील कार्यालय जवळ कमलीवाले बाबांचा दर्गा आहे. तसेच म्हेत्रे नगर परिसरात पीर हजरत शाह हुसेनी दर्गा परिसरात अतिक्रमण वाढले आहे. यासंदर्भात गत सहा महिने कायदेशीर प्रक्रिया सुरू होती. त्याची मुदत 6 रोजी संपली. त्यानंतर अतिक्रमण काढून घेण्याची जबाबदारी दर्गा अतिक्रमण धारकांची होती. त्यानंतर नगर परिषद व तहसील कार्यालयाने संयुक्तपणे अतिक्रमण हटवण्यासाठी तीन पोकलेन व दोन जेसीबी तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सुमारे दीडशे पोलीस व प्रशासनाचा फौजफाटा हजर ठेवला होता.
या सार्या धडक कारवाईच्या पार्श्वभूमीवर देवाभाऊचा बुलडोझर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करूनच कारवाईसाठी थेट जिहादीमध्ये घुसतो. काल सुटीमुळे मोहीम एक दिवस पुढे गेली, पण अक्कलकोट आणि छ.संभाजीनगर येथील जिहादींचे कंबरतोड कारवाईमुळे विरोधकांनी धसका घेतला आाहे. म्हणून महाराष्ट्राला देवाभाऊ हवाय. हवाय!
राज्याच्या गृहखात्याने प्रशासनाकडून अनधिकृत अतिक्रमण निष्कासन मोहीम फत्ते करून जिहाद्यांचे कंबरडे मोडले आहे. यासंदर्भात वार्ता, बातम्या, खबर, यूट्युबवर पब्लीश होत नाहीत, तसेच चॅनल्सवर 24 तास नव्हे काही सेकंदभरही दाखवल्या नाहीत. म्हणून देवाभाऊचा बुलडोझर ही "टॅगलाईन" सर्वदूऱ जाण्यासाठी लक्ष्यवेध न्यूज चा वार्ताप्रपंच.
What's Your Reaction?