होटगी बृहन्मठात विहिंपच्या दुर्गा, मातृशक्तीचा जागर

शौर्य प्रशिक्षण वर्गात 150 शिक्षार्थ्यांना लाठी, छुरिका, नियुध्द, संस्कार, सत्संग व बौध्दिकचे धडे; काशी पीठ आणि श्रीशैल पीठ जगद्गुरूंचे आशीवर्चन हा दुग्धशर्करा योग

Oct 13, 2026 - 12:24
 0  4
होटगी बृहन्मठात विहिंपच्या दुर्गा, मातृशक्तीचा जागर

सोलापूर : विश्‍व हिंदू परिषद दुर्गा वाहिनी व मातृशक्तीचा विभागीय तीन दिवसीय शौर्य प्रशिक्षण वर्ग श्री बृहन्मठ होटगी संस्थान, एसव्हीसीएस प्रशाला येथे पार पडला. पुढील आठवड्यापासून नवरात्र दुर्गाशक्ती उपासनेच्या पृष्ठभूमींवर होटगी बृहन्मठात प्रशिक्षणार्थी दुर्गा आणि मातृशक्तीचा जागर झाला. विशेष म्हणजे काशी पीठ आणि श्रीशैल या दोन पीठांच्या जगद्गुरूंचे आशीवर्चन हा दुग्धशर्करा योग होय. 
    शौर्य प्रशिक्षण वर्गात योग, दंड, छुरिका, यष्टी,  नियुद्ध, तलवारबाजी, समता, मैदानी खेळ तसेच बालसंस्कार, सत्संग,सेवा,स्वावलंबन, स्वयंउद्योग, संस्कृत, दुर्गाशक्ती जागरण आणि विविध बौद्धिक सत्रांचे आयोजन केले होते. या प्रशिक्षणात  29 गावांमधून दुर्गा व मातृशक्ती असे एकूण 150 शिक्षार्थी यांचा सहभाग उत्स्फूर्त होता. प्रशिक्षणातून हिंदू संगठन, संस्कार, शिस्त आणि राष्ट्रसेवेचा संकल्प केला. या शौर्य वर्गाचे नियोजन विभागमंत्री विजयकुमार पिसे आणि वर्गाचे व्यवस्था प्रमुख संजय जमादार यांनी केले होते.  


     वर्ग प्रमुख तथा विभाग संयोजिका प्रगती नाकुरे, ऐश्‍वर्या सारोळकर, मातृशक्ती जिल्हा संयोजिका माधुरी एकबोटे आणि मुख्य शिक्षिका पायल परदेशी यांनी पहाटेपासूनचे तीन दिवसीय प्रशिक्षणाचे  वेळापत्रक आखले होते. प्रार्थना कुलकर्णी (ध्वजवाहिका व नियुद्ध), प्रगती नाकुरे (योग व खेळ), ऐश्‍वर्या सारोळकर (बौद्धिक), स्वाती बोल्ली (दंड), युविका कदम (छुरिका), राजलक्ष्मी आमणे (यष्टी) नंदिनी बासुतकर (नोंदणी व रंजनसत्र) आणि माधुरी एकबोटे यांनी मातृशक्तीच्या प्रशिक्षणाचे नियोजन यशस्वीपणे पार पाडले. या वर्गात प्रिया रसाळ (प्रांत संयोजिका मातृशक्ती) आणि सुरेखा बल्लाळ (बालसंस्कार प्रमुख), आरती ताई (प्रांत सहसंयोजिका दुर्गावाहिनी), पूजा शर्मा (प्रांत महाविद्यालयीन प्रमुख), विजय देशपांडे (पालक) आणि विभागमंत्री विजयकुमार पिसे यांनी बौध्दिक सत्र घेतले.
   अभ्यासवर्गाचा समारोप काशी पीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्‍वाराध्य शिवाचार्य महास्वामीजी यांच्या प्रेरणादायी आशीर्वचनाने झाला. आपल्या मार्गदर्शनातून संस्कारयुक्त संघटित व राष्ट्रनिष्ठ समाज निर्मितीसाठी दुर्गा आणि मातृशक्तीची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून हीच राष्ट्रशक्ती आहे, असे गौरवोद्गार जगद्गुग़ुरू डॉ.मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामीजींनी काढले.    तीन दिवसीय अभ्यासवर्गाच्या उद्घाटनप्रसंगी प्रांत अध्यक्ष प्रा.गजानन धरणे, जिल्हाध्यक्ष विष्णुपंत मोंढे पाटील, प्रांत विशेष संपर्काचे पुरुषोत्तम उडता, कोषाध्यक्ष हितेश माधू यांची प्रमुख उपस्थिती होती.
    दुर्गा व मातृशक्तीमध्ये स्वसंरक्षण, आत्मविश्‍वास, नेतृत्वगुण, शारीरिक क्षमता आणि हिंदू संस्कारांप्रती दृढनिष्ठा निर्माण झाली. संस्कृत अभ्यासिका डॉ. अर्पणा कल्याणी व तेजश्री आडम पगडीमल, योगशिक्षिका मोनिका गड्डम व उन्मिता महेश्‍वरम आणि स्वावलंबन उद्योगविषयक चन्नवीर बंकूर यांनी मातृशक्ती वर्गात मार्गदर्शन केले. त्यामुळे शौर्य प्रशिक्षण वर्ग बहुआयामी ठरला, अशा भावना शिक्षार्थ्यांनी व्यक्त केल्या.
    वर्ग यशस्वीपणे पार पाडण्यासाठी बृहन्मठाचे सचिव शांतय्या स्वामी, विश्‍वस्त तथा नगरसेवक शिवानंद पाटील यांचे मोलाचे सहकार्य लाभले. तसेच वर्ग व्यवस्थाप्रमुख तथा विभाग सहमंत्री संजय जमादार यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हामंत्री जयदेव सुरवसे, सहमंत्री बाबू गिरगल, विष्णुपंत जगताप, गोपाळ सुरवसे, शिवाजीराव घोडके, बजरंग दल संयोजक अभय कुलथे, माजी संयोजक माणिक रेड्डी, राजशेखर पाटील, सिध्देश्‍वर गोकावी, महाविद्यालयीन प्रमुख कृष्णा देशपांडे, राजशेखर पाटील, सिध्देश्‍वर गोकावी, चन्नबसव सोलापुरे, अमीत सारोळकर, बालाजी राजपूत, आकाश सूर्यवंशी, बसवराज कारले, सुनील यलशेट्टी, संजय मळेकर, आनंद बुर्‍हांडे, गणेश गाडेकर, किशोर रमणशेट्टी, सुरेश उपासे, बाबुराव लुटे, मधुकर रापेल्ली, कीर्तीकुमार पद्मा, रवी बोल्ली, प्रज्वल बासुतकर, राजेश यनगंटी, नागराज यनगंटी, विनोद गौडा, अरुण नंदाल, रवींद्र येदूर, संजीव चिप्पा, अजय गवसने, मदन राठोड, सुनील शिंदे, विनोद शिंदे, लक्ष्मण चन्ना, संदीप कटकधोंड, अमित गडगी तसेच सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी बहुमोल परिश्रम घेतले. 

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow