साहित्य संमेलनातही राडा,महामंडळ कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णीना फासले काळे,मिलींद जोशी मात्र बचावले
सातारा साहित्य संमेलनात अनपेक्षित घटनेमुळे खळबळ,संमेलनासाठी 2 कोटी सरकारने उधळल्यामुळे निषेध
(विजयकुमार पिसे)
सातारा येथे कालपासून सुरू झालेल्या शतकपूर्व (99 व्या) अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात अनपेक्षित घटना घडली. साहित्य महामंडळाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी यांना काळे फासले. या संमेलनाचे कथित सर्वेसर्वा तथा अध्यक्ष प्रा.मिलींद जोशी मात्र बालंबाल बचावले. दरम्यान या घटनेनंतर संमेलनस्थळी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
महामंडळाच्या कार्याध्यक्षांना काळे फासल्याने मराठी साहित्य संमेलनाला गालबोट लागले. साहित्य महामंडळाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी यांना काळे फासण्यात आल्याने संमेलनात एकच खळबळ उडाली. काळे फासणार्या संदीप जाधव यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला आहे. साहित्य महामंडळाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी हे दुपारी प्रकाशन कट्ट्यावरून खाली येत असताना अचानक एकाने त्यांना काळे फासले. त्यामुळे संमेलनात काही काळ संमेलनात गोंधळ उडाला. काही वेळातच शाहुपुरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी काळे फासणार्या तरूणास ताब्यात घेतले. काळे फासण्यासाठी वापरलेल्या केमिकलमुळे विनोद कुलकर्णी यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्यांची प्रकृती बिघडल्यानंतर यांना तातडीने वैद्यकीय मदत देण्यात आली.
याविषयी बोलताना देताना विनोद कुलकर्णी म्हणाले की, दोन-तीन हल्लेखोरांनी केमिकलसारखा काळा पदार्थ माझ्या डोळ्यात घातला. त्यांच्याकडे धारदार शस्त्रे होती. संमेलन उधळून लावू, तुम्हाला संपवू, अशी धमकी दिली आहे. तर महामंडळाच्या कार्याध्यक्षांना काळे फासल्याच्या घटनेनंतर साहित्यिक आणि विचारवंतांच्या वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. तसेच शाहुपुरी पोलिसांनी संदीप जाधव यास ताब्यात घेतलेे आहे. शेतकरी कर्जमाफी होत नाही. पण, संमेलनाला सरकारने दोन कोटी दिले. त्याचा जाधव यानी निषेध नाेंंदवत हे कृत्य केल्याचे सांगितले, अशी माहिती पोलिसांनी दिली.
What's Your Reaction?