वडारवाडात दत्तजयंतीनिमित्त भारुडांतून व्यसनमुक्तीचा जागर,रमाकांत इरकल यांची अध्यक्षपदी निवड

वडारवाडात दत्तजयंतीनिमित्त भारुडांतून व्यसनमुक्तीचा जागर,रमाकांत इरकल यांची अध्यक्षपदी निवड

Nov 18, 2025 - 00:52
 0  40
वडारवाडात दत्तजयंतीनिमित्त भारुडांतून व्यसनमुक्तीचा जागर,रमाकांत इरकल यांची अध्यक्षपदी निवड

  लातूर : ओडियाराज तरुण मंडळ आयोजित दत्त जयंतीनिमित्त वडारवाडा येथे किर्तन, भारुड, भजनातून व्यसनमुक्तीचा जागर करण्यात येणार आहे. यानिमित्त आयोजित बैठक संस्थापक अध्यक्ष पप्पूभाई धोत्रे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी रमाकांत इरकल यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली. त्यांच्या निवडीचे सवार्र्ंनी स्वागत केले. 

 उपाध्यक्ष: राहुल धोत्रे, दीपक बंदपट्टे, कोषाध्यक्ष: गोविंद धोत्रे, सहकोषाध्यक्ष: सुनील विटकर. इतर पदाधिकारी व सदस्यांचीही निवड यावेळी झाली. दत्तजयंती निमित्त बुधवारी (दि.3) व गुरुवारी (दि.4) रोजी धार्मिक आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन केल्याचे संस्थापक अध्यक्ष पप्पूभाई धोत्रे यांनी सांगितले. या बैठकीस बाबासाहेब धोत्रे, विकास कलपुरे, अनिल भांडेकर, सुरज इटकर, सुरज धोत्रे, विशाल धोत्रे, सहदेव कलपुरे, पिंटू मुद्दे, कुणाल वागज, सतीश धोत्रे, संजय सुरवसे, नितीन धोत्रे, शिरीष इटकर, रोहित कंदलगावकर, गणेश धोत्रे, अविनाश मुद्दे आदी पदाधिकारी उपस्थित होते. दत्तजयंती उत्सवत भारुडातून व्यसनमुक्ती या सामाजिक विषयावर भर देण्यात आला आहे. समाजातील युवक आणि नागरिकांना मार्गदर्शन मिळावे यासाठी व्यसनमुक्ती जनजागृती व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केल. या उपक्रमाद्वारे नशेच्या दुष्परिणामांबाबत जागरूकता निर्माण करून समाजाला सकारात्मक दिशादर्शन देण्याचा उद्देश आहे, असे पप्पूभाई धोत्रे म्हणाले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow