विधी शाखेच्या विद्यार्थ्यांचे प्रलंबित निकाल व प्रोव्हिजनल प्रमाणपत्र तातडीने द्या अन्यथा आंदोलन छेडू - ॲड.अनिल वासम
विधी शाखेच्या विद्यार्थ्यांचे प्रलंबित निकाल व प्रोव्हिजनल प्रमाणपत्र तातडीने द्या अन्यथा आंदोलन छेडू - ॲड.अनिल वासम

सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ संलग्न विधी महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांचे प्रलंबित निकाल, गुणांचे पुनर्मूल्यांकन, गुणांची पुनर्मोजणी याबाबत प्रचंड गोंधळ आहे. याबाबत परीक्षा व मूल्यमापन मंडळ यांचेकडे महाविद्यालय मार्फत कार्यालयीन पत्रव्यवहार करूनही त्याची दखल घेतली जात नाही. खाजगी कंपनी मार्फत उत्तर पत्रिका संगणकीय प्रणाली मार्फत तपासणी केली जाते. यामुळे अनेक तांत्रिक त्रुटी निर्माण होत असून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.तसेच उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिल ची सनद घेण्यासाठी प्रोव्हीजनल सर्टिफिकेट ची अनिवार्यता असून ते ही देण्यास विलंब होत आहे. विद्यापीठाकडून होत असलेल्या कृत्यामुळे विद्यार्थ्यांचे संतुलन बिघडत आहे याला जबाबदार कोण ?असा सवाल सामाजिक कार्यकर्ते ॲड.अनिल वासम यांनी उपस्थित केले व तातडीने विद्यार्थांना प्रोव्हीजनल सर्टिफिकेट व प्रलंबित निकाल देऊ न केल्यास त्यांच्या शैक्षणिक नुकसानीस विद्यापीठ जबाबदार राहील असे नमूद करत आंदोलनाचा इशारा देण्यात आला.
गुरुवार दिनांक 8 ऑगस्ट रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे मा.कुलगुरू यांच्या कार्यालय येथे शिष्टमंडळामार्फत निवेदन देण्यात आले. तदनंतर मा.संचालक परीक्षा व मूल्यमापन मंडळ डॉ.श्रीकांत अंधारे यांच्याशी या विषयी सल्लामसलत करण्यात आले. यावेळी या शिष्टमंडळात ॲड.अनिल वासम, शाम आडम ,श्रीप्रसाद अंकलगी, द्वारकेश सावळे आदींची उपस्थिती होती.
What's Your Reaction?






