बोळकोटे परिवारच्या विठ्ठल रुक्मिणी बँक्वेट हॉलचा जगद्गुरूंच्या हस्ते शुभारंभ

भव्य व सुसज्ज मंगल कार्यालय, श्रीकंठ शिवाचार्य स्वामीजी, आ.विजय देशमुख, आ.सुभाष बापू देशमुख यांची प्रमुख उपस्थिती

Nov 6, 2026 - 23:45
 0  6
बोळकोटे परिवारच्या विठ्ठल रुक्मिणी बँक्वेट हॉलचा जगद्गुरूंच्या हस्ते शुभारंभ

सोलापूर : सोलापूर शहराच्या वैभवात मानाचा तुरा रोवणार्‍या मंगल वास्तूची भर पडली असून  भव्य व सुसज्ज मंगल कार्यालय अर्थात विठ्ठल रुक्मिणी बँक्वेट हॉलचा शुभारंभ श्री श्री श्री 1008 जगद्गुरू ज्ञानसिंहासनाधीश्‍वर डॉ. मल्लिकार्जुन विश्‍वाराध्य शिवाचार्य महास्वामीजी (श्री काशीपीठ) यांच्या पावन करकमलांनी व शुभाशीर्वादाने संपन्न झाला.
उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात व मंगलमय वातावरणात पार पडला. या सोहळ्यास श्रीकंठ शिवाचार्य स्वामीजी, (श्री बम्मलिंगेश्‍वर बृहन्मठ, नागणसूर) शहर उत्तरचे आमदार तथा जिल्ह्याचे माजी  पालकमंत्री विजय देशमुख, दक्षिण सोलापूरचे आमदार तथा राज्याचे माजी सहकारमंत्री सुभाष बापू देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच उभय नेत्यांनी पूज्य जगद्गुरू महास्वामीजींचेही आशीर्वाद घेतले. सोलापूर महापालिकेचे माजी सभागृह नेते तथा होटगी बृह्न्मठाचे विश्‍वस्त शिवानंद पाटील, माजी सभापती संजय कोळी, काँग्रेस शहराध्यक्ष चेतन नरोटे, नगरसेवक बसवराज केंगनाळकर तसेच राजकीय सामाजिक, उद्योग क्षेत्रांतील अनेक मान्यवर, प्रतिष्ठित नागरिक व बोळकोटे परिवाराचे सदस्य या वास्तूच्या उद्घाटन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित होते.सोलापूर शहराच्या वैभवात भर घालणारा हा भव्य बँक्वेट हॉल विवाह सोहळे, कौटुंबिक कार्यक्रम आणि विविध मंगलकार्यासाठी एक आकर्षक ठिकाण ठरणार आहे. या सोहळ्याप्रसंगी बोळकोटे परिवारातील काशप्पा बोळकोटे, माजी नगरसेवक भीमाशंकर बोळकोटे, चेतन बोळकोटे, ऋषीकेश बोळकोटे, परिमल बोळकोटे यांनी सर्व उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow