'लोकशाही बचाव, अराजकता हटाव' भाजप मोर्चाची जय्यत तयारी

प्रमुख बाजारपेठेतून आज भव्य मोर्चा; दिवाळीमुळे व्यापारी वर्ग, ग्राहक अस्वस्थ,*बीजेपीचा 'व्होकल' for 'लोकल' नारा

Nov 4, 2026 - 09:04
 0  5
'लोकशाही बचाव, अराजकता हटाव' भाजप मोर्चाची जय्यत तयारी

 सोलापूर: 'लोकशाही बचाव, अराजकता हटाव'च्या  अनुषंगाने विरोधकांना चोख प्रत्युत्तर म्हणून शहर भाजपने आज जय्यत मोर्चाची तयारी केली आहे. शहरातील प्रमुख मार्ग बाजारपेठेतून भव्य मोर्चा जाणार आहे. या पार्श्‍वभूमीवर व्यापारी वर्ग नाराज दिसत आहे. विशेष म्हणजे गुरुवारपासून दिवाळीस प्रारंभ होत आहे. त्यामुळे विरोधकांनीही हरकत घेतली आहे.
  दरम्यान आज  काही व्यापारी पदाधिकारी यांनी नियोजित मोर्चा मार्गावरून नाराजी व्यक्त केली. विशेष म्हणजे येथील  व्यापारी वर्ग कायम भाजप विचाराचा समर्थक आहे. दिवाळीमुळे ग्राहक खरेदीसाठी बाहेर पडतो. शाळांचाही आज शेवटचा दिवस आहे. सायंकाळची गर्दी पाहता भाजप समर्थक घटकाला हेतुतः दुखावण्याचा प्रकार असून नियोजित मार्ग बदलण्यात आला, अशीही तक्रार आहे. तसेच प्रशासनानेही मोर्चा मार्गाविषयी मत व्यक्त केले नाही का? असे मत व्यक्त केले जात आहे.
   आजच्या भव्य पदयात्रेचे नियोजन, मार्गक्रमण आणि कार्यकर्ते व नागरिकांच्या सहभागाबाबत शहराध्यक्षा तडवळकर, सभागृह नेता काळे, महापौर कोंड्याल यांनी मॅरेथॉन बैठका गेल्या आठवड्यात घेतल्या. दरम्यान आ. विजयकुमार देशमुख यांनी मंगळवारी संपर्क कार्यालयात बैठक घेत सविस्तर मोर्चाचा आढावा घेतला.
   या पदयात्रेचे नियोजन असे:
 बुधवार, ४ नोव्हेंबर २०२६,  
वेळ: दुपारी ४ वाजता मोर्चा निघणार आहे. पदयात्रेचा मार्ग असा: छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून प्रारंभ. बाळीवेस चौक – टिळक चौक – मधला मारुती मार्गे महात्मा बसवेश्वर महाराज सर्कल, कोन्तम चौक येथे समारोप.
    लोकशाहीच्या रक्षणासाठी, संविधानाच्या सन्मानासाठी आणि देशहिताचा आवाज बुलंद करण्यासाठी सोलापूर शहर व जिल्ह्यातील सर्व देशप्रेमी, लोकशाहीप्रेमी नागरिकांनी आणि कार्यकर्त्यांनी या पदयात्रेत मोठ्या संख्येने उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन भाजपाने केले आहे. 

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow