विश्व हिंदू परिषद 100 कुटुंबाची घरवापसी करणार
अशोक जी सिंघल जन्मशताब्दीनिमित्त धर्मप्रसार विभागाचा संकल्प; धर्मरक्षणात संतांचे योगदान: अॅड. आलोक कुमार जी प्रांत धर्म प्रसार विभागाच्या अभ्यास वर्गात क्षेत्रीय संघटन मंत्री अनिरुद्ध पंडित, जितेंद्र सिंह, किशोर चव्हाण, अॅड.मृणालिनी पडवळ, मुकेश दायमा यांचे मार्गदर्शन
पुणे : यंदाचे वर्ष रामजन्मभूमी आंदोलनाचे सरसेनानी श्रध्देय अशोकजी सिंघल जन्मशताब्दीचे वर्ष असून या कालावधीत विश्व हिंदू परिषदेच्या वतीने सोलापूर जिल्ह्यात 100 कुटुंब/परिवाराची हिंदू धर्मात घरवापसी/परावर्तन करणार आहे. प्रांताच्या धर्म प्रसार विभागाचा विशेष अभ्यास वगर्र् पुणे येथे पार पडला. याप्रसंगी विहिंपचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष अॅड.श्री आलोक कुमार जी, क्षेत्रीय संघटन मंत्री अनिरुद्ध तथा अण्णा पंडित, केंद्रीय सहमंत्री जितेंद्र सिंह, प्रांत अध्यक्ष प्रा.गजानन धरणे, प्रांत मंत्री किशोर चव्हाण, अॅड.मृणालिनी पडवळ, मुकेश दायमा, विभागमंत्री विजयकुमार पिसे उपस्थित होते.
सोलापूर जिल्ह्यात मोची,मातंग,बंजारा, चर्मकार समाज मोठ्या संख्येने असून मिशनरींकडून धर्मांतराचे प्रयत्न सातत्याने होतात. विहिंप बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी त्यांचा प्रयत्न हरवून टाकला. धर्मांतरणामुळे हिंदू समाजावर आघात होतो. हिंदू समाजाचे संरक्षण करण्यासाठी विहिंप कटिबध्द आहे. हिंदू समाजात परावर्तनची चळवळ अधिक गतिमान करण्याची आवश्यकता असून यंदा अशोक जी सिंघल जन्मशताब्दी कालावधीत 100 कुटुंब परिवाराचे परावर्तन करण्याचा निश्चय विहिंपने केला आहे, अशी माहिती विभागमंत्री विजयकुमार पिसे यांनी विहिंपच्या अभ्यास वर्गात दिली.
धर्मरक्षणातील संतांचे योगदान महत्वपूर्ण आहे. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींच्या गावांमध्ये आणि वस्त्यांमध्ये संत आणि ऋषीमुनींचे वास्तव्यामुळे धर्मपरावर्तन चळवळीस गती मिळाली आहे, असे अॅड.आलोक कुमारजी म्हणाले. क्षेत्रिय संघटन मंत्री अनिरुद्ध जी पंडित यांनी, धर्मांतर रोखणे आणि धर्मबांधवांची घरवापसी परावर्तन करण्यासाठी प्रयत्नांची गरज स्पष्ट केली.
अॅड. आलोक कुमार जी पुढे म्हणाले, शीख गुरू अर्जुन देव जी आणि गुरु तेग बहादूर जी यांनी धर्मासाठी आपल्या प्राणांचे बलिदान दिले. विद्यारण्य स्वामींनी हरिहर राय, बुक्क राय यांनी घरवापसी परतण्याची व्यवस्था केली होती. पेजावर पीठाचे पीठाधीश्वर स्वामी विष्णू प्रपन्नचार्य यांनी चातुर्मास दरम्यान, दर रविवारी दिल्लीतील वंचित वस्त्यांना भेट देऊन एका घरात रामदीप प्रज्वलित करत आणि तेथून अन्नग्रहण करत, ज्याचे चांगले परिणाम दिसून आले. म्हणूनच, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींच्या गावांमध्ये आणि वस्त्यांमध्ये संत आणि ऋषीमुनींचे वास्तव्यामुळे चांगले परिणाम मिळतात. केंद्रीय सहमंत्री आणि धर्म प्रसारचे अखिल भारतीय सहप्रमुख श्री. जितेंद्र सिंह यांनी परियोजनेविषयी मार्गदर्शन करताना त्यांनी सांगितले की, जातींची निवड, त्यांच्या इतिहासाचा, गौरवशाली योगदानाचा, लोकदेवतांचा, ऐतिहासिक स्थळांचा, सणांचा आणि प्रार्थनास्थळांचा सखोल अभ्यास आणि माहिती संकलित केली पाहिजे. तसेच त्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी प्रयत्न केले पाहिजेत. प्रत्येक विहिंप कार्यकर्त्याने घरवापसी यशस्वी करण्यासाठी आपला अनुभव पणाला लावावा आणि कठोर परिश्रम करावेत. प्रांत मंत्री किशोर चव्हाण आणि प्रांत धर्म प्रसार प्रमुख सुश्री अॅड. मृणालिनी पडवळ यांंनीही यावेळी मौलिक मार्गदर्शन केले.
प्रांत अभ्यास वर्गात 11 जिल्ह्यांमधून कार्यकर्ते सहभागी झाले होते. सोलापूर जिल्ह्यातून विभागमंत्री विजयकुमार पिसे, सहमंत्री संजय जमादार, जिल्हामंत्री जयदेव सुरवसे यांच्या नेतृत्वाखाली विष्णू जगताप, मार्डी आणि बाबू गिरगाल विडी घरकुल(जिल्हा सहमंत्री), मृत्युंजय कल्याणी :धर्म प्रसार आयाम (जिल्हा सहप्रमुख), अजय गवसने, सिंदखेड (दक्षिण सोलापूर प्रखंड सहमंत्री), मल्लिनाथ पाटील: (मजरेवाडी वीर हनुमान प्रखंड), शिवराज चिवडशेट्टी: होटगी,(दक्षिण सोलापूर प्रखंड), गौरव घम: (कर्णिकनगर अशोक प्रखंड), मुकुंद देशपांडे: (मंगळवेढा प्रखंड), सुशांत हुल्ले (विमानतळ), जगदीश हेळकर (मंद्रुप), नंदकुमार टेळे (मंद्रुप), प्रवीण जिल्ला, विशेष संपर्क विभाग, अनिल कोळी प्रखंड मंत्री हे विहिंप व बजरंग दलाचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.
What's Your Reaction?