साखरेत मिलीभगत,साखर कारखानदारच व्यापारी!

शेतकरी आणि ग्राहकांना चुना*48 लाख टन म्हणजे 3 लाख ट्रक साखर बेकायदा निर्यात, तर आयात साखर ऑक्टोबरपूर्वी येणार नाही

Aug 26, 2026 - 11:53
 0  95
साखरेत मिलीभगत,साखर कारखानदारच व्यापारी!

(विजयकुमार पिसे)
नवी दिल्ली : साखरेच्या विक्रमी दरवाढीत कारखानदार आणि व्यापारी यांच्यात मिलीभगत आहे. कारण साखर कारनादारच व्यापारी आहेत. त्यांनी 48लाख टन साखर बेकायदा निर्यात केली आहे. शेतकरी आणि ग्राहकांना चुना लावला अशी प्राथमिक माहिती आहे. तसेच या संदर्भात शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी दरवाढ अनैसर्गिक आहे. शिवाय यासाठी सरकारचे धरसोड धोरण कारणीभूत असून साखर आयात केल्यास याचा फटका शेतकर्‍यांनाच बसेल, याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे.
  मागणी आणि पुरवठ्याचे गुणोत्तर बिघडल्यावरच कोणत्याही  वस्तूचे भाव वाढतात किंवा कमी होतात. भारताला 275 लाख टन  साखरेची गरज आहे. प्रत्यक्षात गेल्यावर्षी हंगाम सुरु झाला तेव्हा 47 लाख टन साखर शिल्लक होती. इथेनॉलचे उत्पादन घेऊन सुद्धा 291 लाख टन साखर उत्पादन झाले. म्हणजे 338 लाख टन साखर आपल्याकडे उपलब्ध आहे. 
    एकूण साखरेपैकी केवळ 247 लाख टन साखर कोटा खुला केला आहे. निर्यात वजा जाता 83 लाख टन साखरपैकी 48 लाख टन साखर कुठे गेली? याचा अर्थ जो कोटा होता त्यापेक्षा जास्त साखर काही कारखान्यांनी कमी दरामध्ये विकली,तर काही व्यापार्‍यांनी आगावू खरेदी करुन आता भाव वाढवले आहेत. यामागचे आणखी एक कारण म्हणजे अनेक साखर कारखानदार हेच व्यापारी आहेत, असा शेट्टी यांचा आरोप आहे. त्यामुळे त्यांनी शेतकर्‍यांना चुना लावण्याचा उद्योग कारखानदारांनी केला आहे. जी साखर 3600 आणि 3700 रुपये क्विंटलने खरेदी केली, ती आज ते 6500 रुपये क्विंटलने विकायला लागले आहेत. यावर नियंत्रण ठेवण्याचे काम सरकारचे होते, त्यांचीही संमती आहे का? असा प्रश्‍न उपस्थित होतो.
आयात साखर 15 ऑक्टोबरच्या आत येणार नाही. 15 सप्टेंबरपासून देशात काही ठिकाणी कारखाने सुरू होणार आहेत. साखर आयात करण्याचा निर्णय मूर्खपणाचा ठरेल. कारण, याचा फटका पुन्हा शेतकर्‍यांना बसेल, अशी भीती आहे. 

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow