डोनाल्ड ट्रम्पला डंख; शांततेचं नोबेल नाहीच!
नोबेलसाठी खूप आटपिटा, पाकचं युध्द मीच थांबवलं, त्यासाठी म्हणे मोदींना फोन केला. पण सारं व्यर्थ आणि खोट्टं
(विजयकुमार पिसे)
विश्वप्रतिष्ठित नोबेलचं शांतता पुरस्कार मिळवण्यासाठी इतर राष्ट्रांना केलेला डंख, डोनाल्ड ट्रम्पलाच डंख करून गेला. आणि हा शांततेचा पुरस्कार अमेरिकेच्याच शत्रुराष्ट्रातील एका महिलेस मिळाला. मी 8 युद्धे थांबवली आहेत म्हणून नोबेल पुरस्कारासाठी केलेला ट्रम्प डाव ट्रम्प यांच्या पदरी निराशा करणारा ठरला. पाकचं युध्द मीच थांबवलं, त्यासाठी म्हणे मी मोदींना फोन केला. पण सारं व्यर्थ आणि खोट्टंंच!!
पहलगाम हल्ल्यानंतर ऑपरेशन सिंधूरने पाकड्यांची पळताभुई केली. तेव्हा इंडी आघाडीने रान उठवले. खरं काय ते सांगा, अशी ट्रम्प भाषा आघाडीची होती. मात्र नॉर्वेजियन नोबेल समितीने व्हेनेझुएलाच्या मारिया कोरिना मचाडो शांततेसाठीचा नोबेल पुरस्कार जाहीर केल्यामुळे चवताळलेले ट्रम्प नार्वेला डंख करतील का? व्हेनेझुएलातील लोकांसाठी लोकशाही हक्क, हुकूमशाही ते लोकशाहीपर्यंत शांतीपूर्ण संक्रमणाचे काम कोरिना मचाडो यांनी केले आहे. या घोषणेमुळे सर्वात मोठा धक्का डोनाल्ड ट्रम्प यांना बसला आहे.
गेल्या काही महिन्यांपासूनच ते शांततेचा नोबेल पुरस्कार मिळावा यासाठी दावा करत होते. नोबेल शांती पुरस्कार विजेत्या मारिया कोरीना मचाडोंनी गेल्या एका वर्षापासून भूमीगत जीवन जगत असतानाही आपला संघर्ष कायम ठेवला होता. नोबेल समितीने म्हटले की, त्यांच्या जीवाला गंभीर धोका असतानाही त्या देशातच राहिल्या. त्यांची निवड लाखो लोकांना प्रेरणा देईल.
मारिया कोरिना मचाडो 2011 ते 2014 पर्यंत व्हेनेझुएला राष्ट्रीय सभेद्वारे निवडलेल्या सदस्य म्हणून कार्यरत होत्या. त्या व्हेनेझुएलाच्या सध्याच्या सरकारविरोधात लोकशाही मार्गाने आंदोलनाचे नेतृत्व करत आहेत. मारिया पेशाने इंजिनीयर आहेत. यंदाच्या शांतता नोबेल पुरस्कारासाठी 338 व्यक्ती आणि संस्थांना नामांकन प्राप्त झाले होते. या यादीत डोनाल्ड ट्रम्प यांचे नाव आघाडीवर आणि प्रतिष्ठेचे केले होते. शिवाय पाकसह इस्रायल, आर्मेनिया, अजरबैजान, कंबोडिया आणि रवांडा इत्यादी देशांनी त्यांचे समर्थन केले होते. मी तर अनेक युद्ध थांबवली असेही म्हणाले होते.
What's Your Reaction?