होटगी मठाचे कार्य अत्यंत मोलाचे : प्रा. धरणे

श्री मद्वीरशैव गुरुकुल मठाच्या वतीने श्री रेणुकाचार्य जयंती साजरी

Mar 2, 2026 - 00:02
 0  2
होटगी मठाचे कार्य अत्यंत मोलाचे : प्रा. धरणे
होटगी येथील श्री बृहन्मठात श्री रेणुकाचार्य जयंती उत्सव

श्री बृहन्मठ, होटगी (बाळीवेस) येथील श्री मद्वीरशैव गुरुकुल मठाच्या वतीने श्री रेणुकाचार्य यांची जयंती रविवारी मोठ्या भक्तिभावाने साजरी करण्यात आली. यावेळी प्राचार्य गजानन धरणे यांनी होटगी मठाचे कार्य अत्यंत मोलाचे आहेे, असे गौरवोद्गार काढले.
    श्री श्री श्री  १००८ डॉ. मल्लिकार्जुन विश्‍वाराध्य शिवाचार्य महास्वामीजी यांच्या आशीर्वादाने आणि होटगी मठाचे मठाध्यक्ष श्री ष.ब्र.चन्नयोगी राजेंद्र शिवाचार्य यांच्या मार्गदर्शनाखाली श्री रेणुकाचार्य यांची जयंती प्रसंगी प्राचार्य धरणे यांनी व्यक्त केले.
   प्रारंभी वेदमूर्ती महांतेश शास्त्री यांच्या वैदिक मंत्रोच्चारांतर्गत रुद्राभिषेक, बिल्वार्चन व महाआरती करण्यात आली. सदाचार स्त्री समाज, भ्रमरांबिका भजन मंडळ तसेच नगरसेविका बबीता बिपीन धुम्मा यांच्या वतीने धार्मिक विधी पार पडले. यावेळी पश्‍चिम महाराष्ट्र हिंदू धर्म सभेचे उपाध्यक्ष गजानन धरणे यांनी आपल्या भाषणात होटगी मठाचे कार्य अत्यंत मोलाचे असल्याचे सांगितले. मठाच्या माध्यमातून वीरशैव लिंगायत धर्माचे आचरण व प्रसार-प्रचार करण्याचे महान कार्य तपोरत्न योगीराजेंद्र शिवाचार्य महास्वामीजी यांनी केल्यामुळे आज धर्म व गुरुपरंपरा टिकून आहे, असे त्यांनी नमूद केले. प्रत्येकाने आपल्या घरोघरी जयंती उत्सव साजरा करून धर्माचे आचरण करत राहावे, असे आवाहनही त्यांनी केले.
   या प्रसंगी होटगी मठ संस्थेचे सचिव शांतय्या स्वामी, सिद्धय्या हल्लाळी स्वामी, योगीराज भोगडे, श्री वीरशैव सभेचे समन्वयक चिदानंद मुस्तारे, मनोज हिरेहब्बू, श्री पांढरे, महांतेश स्वामी, मठातील बटू, समाजबांधव तसेच बहुसंख्य माता-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाआरतीनंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महांतेश स्वामी, आभार प्रदर्शन चिदानंद मुस्तारे यांनी मानले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow