श्री श्री रविशंकर आश्रमात गहिनीनाथ महाराज औसेकर यांचा सत्संग
जगभरातील साधकांची उपस्थिती; लवकरच पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी दर्शनाचा श्री श्री रविशंकर गुरुजींचा मनोदय
बंगळुरू : श्री श्री रविशंकर गुरुजी यांच्या बंगळुरू येथील आर्ट ऑफ लिव्हींग इंटरनॅशनल आश्रम येथे विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती चे सहअध्यक्ष सद्गुरू गहिनीनाथ महाराज औसेकर यांचा सत्संग पार पडला एका विशेष कार्यक्रमासाठी ह.भ.प.श्री औसेकर महाराजांना रविशंकरजी यांच्या आश्रमात सत्संगासाठी निमंत्रित केले होते. रविशंकर गुरुजी व गहिनीनाथ महाराज यांचा अनेक वर्षापासून स्नेह व संपर्क आहे.
आजच्या धावपळीच्या जगात माणसाला आध्यात्मिक साधना शक्तीच स्थिर करू शकते आणि यातूनच जगाचे कल्याण व मानव जातीचा उध्दार होऊ शकतो. श्री श्री रविशंकर गुरुजींनी भारतीय वेदशास्त्राचा प्रचार जगभर करून वेदांचा अभ्यास करणारा एक वर्ग तयार केला आहे.
सामान्य लोकांना जीवन जगण्याची कला याचा मंत्र देऊन त्यांचे जीवन समृद्ध केले. अशा अनेक अवघड गोष्टी गुरुजीनी साधकांसाठी सोप्या केल्या आहेत. भारतीय सनातन ऋषीं परंपरेला जगभर उजाळा दिला आहे, असे गहिनीनाथ महाराज यांनी सत्संग प्रसंगी सांगितले.
या कार्यक्रमात जगभरातील विविध देशातील साधक उपस्थित होते. लवकरच रविशंकर गुरुजीनी पंढरपूर विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी येण्याचा मनोदय व्यक्त केला. याप्रसंगी आर्ट आँफ लिव्हींग परिवाराच्या वतीने श्री. गहिनीनाथ औसेकर महाराज यांचा सन्मान करण्यात आला.
What's Your Reaction?