शिक्षण सम्राटांसाठी पदवीधर, शिक्षक मतदारसंघ राखीव

पुणे, सोलापुरात ठंडा ठंडा, कुल कुल, स्वागत अन् जल्लोष करायचंय, पण काढलं फर्मानं परवानगी शिवाय...

Oct 6, 2026 - 03:39
 0  3
शिक्षण सम्राटांसाठी पदवीधर, शिक्षक मतदारसंघ राखीव

(विजयकुमार पिसे)
पुणे पदवीधर मतदारसंघात भाजपचा मास्टर स्ट्रोक? 24 तास उलटून गेल्यानंतरही उमेदवारीच्या घोषणेचं ना स्वागत ना जल्लोष. पुणं काय सोलापूर काय? ठंडा ठंडा, कुल कुल. हा मास्टर स्ट्रोक म्हणजे निवडणुकीसाठीचं नवं क्वालिफिकेशन. शिक्षण सम्राट! पदवीधर आणि शिक्षक़ांना न्याय मिळावा, त्यांना सन्मान मिळावा म्हणून त्यांच्यासाठी मतदारसंघ राखीव. आता ही किमान अपेक्षा संपल्यात जमा झालीय. अपवाद फक्त भाजपचं नाही, अन्य राजकीय पक्ष देखील. 
   पुणे पदवीधरसाठी इनकमिंग आमदारपुत्र शरद लाड यांचं नाव चर्चेत होतं. दादा पाटलांनी पक्ष प्रवेश देतेवेळी जाहीर देखील केलं. म्हणून स्वारी तयारीतच. मात्र ऐनवेळी (भाजप)/दादांचा त्यांनाच स्ट्रोक!
   कोल्हापूर,पुण्यातील शिक्षण सम्राटांची कन्या आणि नामवंत दैनिकाच्या मालकांची सून स्मिता योगेश जाधव यांना उमेदवारी जाहीर झाली. त्यानंतर पुण्यात भाजपा पक्ष प्रवेशाचा सोहळा पार पडला. म्हणजे आधी तिकीट मग इनकमिंग. तीच स्थिती शिक्षक मतदारसंघाची कोल्हापुरातील नामचीन शिक्षण सम्राटाच्या संस्थेत सीईओ म्हणून कार्यरत कौस्तुभ गावडे  यांना उमेदवारी. जाधव आणि गावडे यांच्या नावाची घोषणा झाली, त्याविषयी कुणी इच्छुकांनी 'ब्र'  नाही काढला, हे विशेष. म्हणजे सर्व इच्छुक उमेदवार व कार्यकर्त्यांना दादांचा व बावनकुळेंचा मास्टर स्ट्रोक एकमताने 'मान्न्य' 
   दादा समर्थक राजेश पांडे, माणिक पाटील चुयेकर, मकरंद देशपांडे आणि रोहन देशमुख (सोलापूर) हे शर्यतीत होते, पण दादांकडूनच आमदारपुत्राचे खूप 'लाड' पुरवले. जणू आमदार अरुण लाडांचे पुत्र आमदारच झालेत. या मास्टर स्ट्रोक नंतरही ना गम, ना खुशी का? पुणे, सोलापुरातील पक्ष कार्यालयासमोर  सोमवारी जल्लोष होईल, अशी माध्यमकर्मींची अपेक्षा होती. संपर्क देखील केला. पण कळाले. त्यासाठी परवाना नाही. तसं फर्मान सोडल्याचे समजले. जिथे आमदारपुत्र रोहन देशमुख क्वालिफाय असूनही ते बेदखल होतात, तिथे कुणी स्वागत, जल्लोषाचं धाडस करेल? 
    शहर मध्य आणि ग्रामीण भागातील आमदार, नगरसेवक, पदाधिक़ारी यांनीही टाळलं. 'उत्तर' ही नाही. स्मिता जाधव महिला उमेदवार आहेत, तेव्हा महिला आघाडीकडून देखील स्वागताची निराशा आली. बघू करू म्हणत दिवस संपला.
  गेल्या महिन्यात पदवीधर मतदार नोंदणी बैठकीत पालकमंत्र्यांनी नगरसेवकांना लक्षनिधीचे बक्षीस जाहीर केले होते. तेव्हा मतदार नोंदणी संपर्कासाठी सोशल मिडियावर पाऊस पडला. एका नव्या कोर्‍या आरंभशूर भाजपायी नगरसेवकाचा दांडगा उत्साह. पण जेव्हा नोंदणीचे आकडे समोर आले, त्यात सोलापूर खूप मागे असल्याचे अधोरेखित झाले. कारण उमेदवारी सोलापूर वा पुण्याच्या पदरात पडणारच नाही, ओरिजनल कार्यकर्त्यांना संधी मिळणार नाही. या निवडणुकीशी काही देणे घेणे आहे? 
   *निष्कर्ष असा काढला जातोय की.. पक्षाच्या नावावर, कार्यकर्ता जुना निष्ठावंत असो वा इनकमिंग. त्याच्या या क्वालिफिकेशनवर यंदाची ही निवडणूक जिंकता येईल याची खात्री नसावी. शिक्षण सम्राटच रिंगणात उतरवला तर हा उमेदवार 'अपने खुद के बलबुते पर'....! 
शेवटी जिंकला तर आपला...! पडला तर...!!
  कारण दोन्ही उमेदवार आपल्या विचारधारेचे नाहीतच. मतं घालायची काँग्रेसला, जे आता उमेदवार आहेत. निवडून आला तरी काँग्रेसचाच, पडला तरीही.. हाच तो मास्टर स्ट्रोक!      

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow