नॉर्थकोटची ओळख पुसली; समाजासाठी जगलेल्या प्रचारकाचे नाव शाळेला!

अरण्यऋषी पद्मश्री पुरस्कारप्राप्त मारुती चितमपल्ली यांचे शिक्षण याच नॉर्थकोट हायस्कूलमध्ये, बॉम्बे प्रेसिडेन्सीचे तत्कालीन ब्रिटिश गव्हर्नर लॉर्ड हेन्री स्टाफर्ड नॉर्थकोट यांच्या नावावरून हायस्कूलचे 1902 मध्ये नामकरण. हे ब्रिटिश नाव विसरण्यास तब्बल सव्वाशे वर्ष लागली

Nov 6, 2026 - 23:42
 0  7
नॉर्थकोटची ओळख पुसली; समाजासाठी जगलेल्या प्रचारकाचे नाव शाळेला!

(विजयकुमार पिसे)

सोलापूर : नॉर्थकोट टेक्निकल हायस्कूल हे महाराष्ट्रातील सोलापूर शहरातील एक जुने आणि तांत्रिक माध्यमिक विद्यालय आहे. भारतात सोलापूरचे मँचेस्टर म्हणून असे जेव्हा नाव होते. या शाळेत  पूर्वी प्रामुख्याने इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल आणि टेक्सटाईल इंजिनियरिंगशी संबंधित तांत्रिक शिक्षण दिले जात असे. तसेच अरण्यऋषी पद्मश्री पुरस्कारप्राप्त मारुती चितमपल्ली यांचे शालेय शिक्षण याच शाळेतून झाले होते. 
सोलापूरच्या या ऐतिहासिक शाळेला नॉर्थकोट हे नाव मुंबई इलाक्याचे तत्कालीन ब्रिटिश गव्हर्नर लॉर्ड हेन्री स्टाफर्ड नॉर्थकोट  यांच्या नावावरून देण्यात आले आहे. नॉर्थकोट 1900 ते 1903 या काळात  गव्हर्नर होते. तत्पूर्वी ही शाळा 1 फेब्रुवारी 1886 रोजी सुरू झाली. गव्हर्नमेंट हायस्कूल, सोलापूर असे तिचेे प्रारंभीचे नाव होते. भुईकोट किल्ल्याच्या परिसरात एका भाड्याच्या इमारतीत ती भरायची. नॉर्थकोट हे गव्हर्नर असताना 1902 मध्ये सोलापूरच्या या हायस्कूलला त्यांचे नाव  दिले गेले. 1938 मध्ये या शाळेत तांत्रिक  शिक्षण सुरू झाले. स्वातंत्र्यानंतर (1971 मध्ये) याला अधिकृतपणे हायस्कूलऐवजी तांत्रिक प्रशाला असेही नाव देण्यात आले.    सुरुवातीच्या काळात तांत्रिक किंवा इंग्रजी शिक्षणाचे महत्त्व फारसे माहीत नव्हते. त्यामुळे विद्याथॅ जेमतेम असायचे. पटसंख्या वाढ व शिक्षणाचे महत्त्व पटवून देण्यासाठी शिक्षकांनी  ग्रामीण भागात प्रचार केला होता. 1938च्या काळात सोलापूर हे कापड गिरण्यांचे मोठे केंद्र म्हणून उदयास  आले होते.सोलापूरची जुनी गिरणी प्रसिध्द होती.  या गिरणीध्ये रोजगाराची संधी व या हायस्कूलला तांत्रिक दर्जा दिला गेल्यामुळे अनेक कुशल कामगार येथे घडवले गेले. यामध्ये इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, टेक्सटाईल इंजिनिअरिंग कापड उद्योगाविषयी शिक्षणाचा समावेश होता. त्यामुळे ही शाळा केवळ शिक्षणाचे केंद्र नव्हे तर गत 140 वर्ष सोलापूरच्या सामाजिक आणि औद्योगिक इतिहासाचा एक महत्त्वाचा साक्षीदार म्हणून या प्रशालेची ओळख आहे. आता या ऐतिहासिक शाळेचे नामकरण देश समाजासाठी संपूर्ण आयुष्य योगदान दिलेले संघप्रचारक सुरेशराव केतकर तांत्रिक विद्यालय असे नामकरण ऐतिहासिक, अभिमान आणि गौरवास्पद आहे. विशेष म्हणजे सुरेशराव केतकरांचे शिक्षण बी.एससी., बी.एड. म्हणजे शिक्षकी पेशाचे होते. त्यामुळे समाज घडवणारा समाजयोगी शिक्षकाचे नाव या शाळेला मिळाले आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow