सिंहगडचे शिक्षण सम्राट नवलेंना कोर्टाचा दणका; तब्बल 60 कोटी कोर्टात जमा

थकीत वेतनप्रश्नी मारुती नवले यांना न्यायालयाचा दणका; शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा संप, संस्थेच्या कारभारावर पुन्हा प्रश्नचिन्ह

Nov 6, 2026 - 23:54
Nov 7, 2026 - 00:03
 0  133
सिंहगडचे शिक्षण सम्राट नवलेंना कोर्टाचा दणका; तब्बल 60 कोटी कोर्टात जमा

(विजयकुमार पिसे)
मुंबई : महाराष्ट्रातील नामवंत शिक्षण संस्था सिंहगड इन्स्टीट्यूटचे संस्थापक शिक्षण सम्राट मारुती नवले यांना मुंबई हायकोर्टाने दणका दिल्यानंतर त्यांनी तातडीने सुमारे 60 कोटी रुपये कोर्टात जमा केले. 
    दरम्यान आज त्यांच्या शिक्षण संस्थांवर कारवाई झाली. कारण सर्व शिक्षक, शिक्षकेतरांचे वेतन थकवल्यामुळे कर्मचारी संपावर गेले. अध्यापनात गतिरोध आला. विशेष म्हणजे भारतीय मजदूर संघाशी अलीकडेच झालेल्या एका बैठकीत थकीत वेतन विनाविलंब देण्याचा निर्णय झाला होता. त्यांनंतर आंदोलन मागे घेण्याचा निर्णय झाला. तरीही कराराची व वेतनाची पूर्तता झाली नाही. त्यामुळे आंदोलक कर्मचार्‍यांनी संपाचे हत्यार उपसले होते.
    सिंहगड इन्स्टिट्युटचे संस्थापक मारुती नवले यांनी वेतन थकवल्याने मुंबई हायकोर्टाने आज दट्ट्या दिला. तेव्हा त्यांनी तातडीने  सुमारे 60 कोटी रुपये कोर्टात जमा केले. वेतन थकीत असल्याने गत दोन एक  वर्षांपासून त्रस्त शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी आक्रमक भूमिका घेत आंदोलन पुकारले. अखेर मुंबई हायकोर्टाने यात हस्तक्षेप करीत थकित वेतन देण्यासाठी आजच पावले उचला अन्यथा हायकोर्टाने सिंहगड शिक्षण संस्थेवर कारवाईचे  निर्देश दिले होते. त्यामुळे शिक्षण सम्राट मारुती नवले झटक्यात सरळ झाले.
    सोलापुरात पुणे महामार्गावर सिंहगडची मोठी शिक्षण संस्था उभी आहे. येथील इमारती, वास्तूंवर तत्कालिन सोलापूऱ मनपा आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी सील ठोकण्याची कारवाई केली होती. या काळात हे प्रक़रण खूप गाजले होते.
   सिंहगड शिक्षण संस्था नेहमीच वादग्रस्त घडामोडींमुळे चर्चेत आणि वादात असते. त्याची प्रचिती थकीत वेतन व कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे पुन्हा एकदा अधोरेखित झाली. 

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow