MLC Election 2026 : विधान परिषद पदवीधर, शिक्षक मतदार संघ निवडणूक जाहीर

23 ऑक्टोबर रोजी मतदान; 27 रोजी मतमोजणी आणि निकाल

Sep 23, 2026 - 12:50
 0  3
MLC Election 2026 : विधान परिषद पदवीधर, शिक्षक मतदार संघ निवडणूक जाहीर

मुंबई : महाराष्ट्र विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या द्वैवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. राज्यातील तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघांसाठी 23 ऑक्टोबर रोजी मतदान, तर 27 ऑक्टोबर रोजी मतमोजणी आणि निकाल जाहीर केला जाणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने या निवडणुकांची मंगळवारी घोषणा केली. पुणे, नागपूर, संभाजीनगर (औरंगाबाद), अमरावती या प्रमुख विभागांतील राजकीय हालचालींना वेग येणार असून निवडणूक आचार संहिता लागू झाली आहे. पदवीधर आणि शिक्षक हे भाजपाचे बालेकिल्ले. तरीही या  मतदारसंघांमध्ये पुन्हा एकदा चुरशीची लढत होण्याची शक्यता आहे.  
   पुणे, नागपूर अमरावती, संभाजीनगर या मतदारसंघात निवडणूक़ होत असून निवडणुकीचे महत्त्वाचे टप्पे याप्रमाणे: मतदान  23 ऑक्टोबर रोजी, मतमोजणी व निकाल  27 ऑक्टोबर रोजी होईल.
पदवीधर आणि शिक्षकांचे प्रश्‍न केंद्रस्थानीअसून या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर विविध राजकीय पक्षांकडून पदवीधर आणि शिक्षक मतदारांशी संपर्क वाढवण्यास सुरुवात झाली आहे. 
   भारतीय जनता पक्षाकडून या मतदारसंघांमध्ये संघटनात्मक मोर्चेबांधणीवर भर दिला जात असल्याचे चित्र आहे. दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेससह इतर पक्षांकडूनही मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी तयारी सुरू आहे.शिक्षकांचे वेतन, जुनी पेन्शन योजना, कायम विनाअनुदानित शाळांचे प्रश्‍न, तसेच पदवीधरांसाठी रोजगार आणि शिक्षणाशी संबंधित मुद्दे या निवडणुकीच्या प्रचारातील प्रमुख विषय ठरण्याची शक्यता आहे.   

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow