अनेक रेल्वे रद्द; देशात अराजकता निर्माण करण्याचा कुटील डाव!
खबरदारी : राजधानी दिल्लीकडे जाणार्या सर्व रेल्वे गाड्या रद्द करण्याची घोषणा, जंतर मंतरवर झुरळांच्या आंदोलनाचा धोका
(विजयकुमार पिसे)
मुंबई: झुरळांच्या (सीजेपी) संघटनेच्या माध्यमातून देशात अराजकता निर्माण करण्याचा कुटील डाव असून खबरदारी म्हणून रेल्वे विभागाने राजधानी दिल्लीकडे येणार्या बहुतांश रेल्वे गाड्या रद्द करण्याची घोषणा केली आहे. 10 ऑक्टोबर रोजी नवी दिल्लीतील जंतर मंतरवर निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात आंदोलनाची हाक दिली इाहे. गेले चार दिवस राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस व पुरोगामी डाव्यांची इंडी आघाडी राजधानीची कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे. आंदोलन हे हत्यार असले तरी अराजकता निर्माण करण्याचा हेतू लपून राहिलेला नाही.
तीन वर्षापूर्वी पंजाब शेतकर्यांच्या आंदोलनाने लाल किल्ल्यावर चढाई केली होती. तशी अभूतपूर्व परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन रेल्वेकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
दरम्यान दिल्ली अंतर्गत मेट्रो व लोकल देखील या काळात धावणार नाहीत. देशभरातून नवी दिल्ली आणि हजरत निजामुद्दीन या स्थानकांवर 10 ऑक्टोबर रोजी पहाटे 4 ते दुपारी 2 या कालावधीत पोहोचणार्या सर्व गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. या दोन्ही स्थानकांच्या परिसरात होणार्या संभाव्य वाहतूक कोंडीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचे रेल्वेकडून स्पष्ट केले आहे.
रेल्वे प्रशासनाच्या या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर आज मुंबईहून दिल्लीला जाणारी राजधानी एक्स्प्रेस ही गाडीही रद्द करण्यात आली आहे. रेल्वेकडून एक पत्रक काढून याबाबतच्या निर्णयाची माहिती देण्यात आली.
दरम्यान आंदोलकांच्या संयुक्त पत्रकार परिषदेत सीजेपीसह ऑल इंडिया स्टुडंट्स असोसिएशन (एआयएसए), ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन (एआयएसएफ), स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय) आणि आपची विद्यार्थी शाखा असोसिएशन ऑफ स्टुडंट्स फॉर अल्टरनेटिव्ह पॉलिटिक्सफ (एएसएपी) या विद्यार्थी संघटना सहभागी झाल्या होत्या. सीजेपी सहसंयोजक सौरव दास यांनी देशभरातील नागरिकांना दिल्लीला येण्याचे आवाहन केले. रेल्वे आणि विमानाची तिकिटे काढून सर्वांनी सहभागी व्हावे, ज्ञानेशकुमार यांनी राजीनामा दिला, तरी आंदोलन मागे घेतले जाणार नाही, कारण संपूर्ण निवडणूक व्यवस्था स्वच्छ करण्याची गरज आहे असलयाचा दावा दास यांनी केला आहे.
What's Your Reaction?