आपद्ग्रस्त 4 शेतकर्‍यांना शासकीय मदतीचा धनादेश, जि.प. सदस्य नेताजी खंडागळे यांचा पुढाकार

वीज कोसळून जनावरे दगावली, 2.19 लाखांची नुकसान भरपाई, कासेगाव, धोत्री, बक्षी हिप्परगा, कुंभारी येथे तीन महिन्यापूर्वी दुर्दैवी अपघात

Oct 10, 2026 - 00:08
 0  1
आपद्ग्रस्त 4 शेतकर्‍यांना शासकीय मदतीचा धनादेश, जि.प. सदस्य नेताजी खंडागळे यांचा पुढाकार

सोलापूर | तीन महिन्यांपूर्वी दक्षिण सोलापूर तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसादरम्यान वीज पडून काही शेतकर्‍यांच्या जनावरांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या नुकसानीपोटी कासेगाव येथील प्रमोद पाटील यांना गायीसाठी 37,500, धोत्री येथील ब्रह्मानंद हिप्परगे यांना गायीसाठी 37,500, बक्षीहिप्परगा येथील शिवाजी निकम यांना बैलासाठी 32,000, तर कुंभारी येथील अप्पाशा इमडे यांच्या सहा म्हशींपैकी तीन म्हशींसाठी 1,12,500 इतकी मदत मिळाली, अशी माहिती या भागातील जि.प.सदस्य नेताजी खंडागळे यांनी दिली.
  दक्षिण सोलापूर तहसील कार्यालय येथे संबंधित शेतकर्‍यांना मदतीचे  धनादेश वितरित करण्यात आले. या मदतीमुळे शेतकरी समाधानी असून, संकटाच्या काळात प्रशासनाने दिलेल्या या आधाराबद्दल त्यांच्यामध्ये समाधानाची भावना निर्माण झाली आहे. 
   तसेच या मदतीसाठी विशेष प्रयत्न करणारे दक्षिण सोलापूरचे तहसीलदार  किरण जमदाडे  यांचे जि.प.सदस्य नेताजी खंडागळे यांनी  आभार मानले आहेत. शेतकर्‍यांच्या अडचणीच्या काळात त्यांच्या पाठीशी उभे राहणे, हाच खरा
 जनसेवेचा धर्म आहे, अशा भावना खंडागळे यांनी व्यक्त केल्या.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow