कॉंग्रेसच्या राज्यात बंद पडलेली विमान सेवा भाजपा काळात सुरू
तब्बल 15 वर्षानंतर विमान उड़ान; केंद्रीयमंत्री मोहोळ व पालकमंत्री गोरे यांनी हिरवा झेंडा दाखवून विमान उड्डाण सेवेचा शुभारंभ केला.

(विजयकुमार पिसे)
2014 पर्यंत देशात, राज्यात व सोलापुरात काँग्रेसची सत्ता होती. तत्कालिन केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे सत्ताधारी होते. होटगी रोड येथील विमान सेवा बंद झाली. तेव्हा बोरामणीकडे अधिक लक्ष्य दिले गेले. यामध्ये नाहक वेळ व पैसा वाया गेला. लोकांचीही दिशाभूल झाली. बोरामणी भागात जागेत कोटींची गुंतवणूक झाली. जागेच्या किमती भरमसाठ वाढल्या. (काहीनी वाढवल्या). होटगी रोड विमानतळाची अवस्था जणू भंगारात झाली होती. शिवाय सोलापूर विकासात 15 वर्ष मागे गेले. दरम्यान 1996 मध्ये वायूदुतची विमान सेवा सुरू झाली. सुशीलकुमार शिंदे पुढाकार घेतला होता. पण प्रतिसादाअभावी ही सेवा नंतर बंद पडली. पुढे शरद पवार व विजयसिंह मोहिते पाटील यांनीही 2009 मध्ये पुढाकार घेतला. किंग फिशर (विजय मल्या)कंपनीची ही सेवा होती. पण 2010 मध्ये ही कंपनीच बंद पडली. 2014 मध्ये देशात परिवर्तन झाले. भाजपाचे मोदी प्रधानमंत्री झाले. देशात नरेंद्र व राज्यात देवेंद्र अशी विकासशील दृष्टी होती. तेव्हाचे खा.शरद बनसोडे यांनी प्रारंभी पाठपुरावा केला. नंतर खा. जयसिध्देश्वर महास्वामी यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता, लोकसभेत मागणीही केली. ही वस्तुस्थिती आहे. पण काँग्रेसने 15 दिवसांपूर्वी विमान उडवून अत्यावश्यक विमान सेवेची खिल्ली उडवली. सोलापूर पिछाडीवर जाण्यात तशी ही काही कारणे पुरेशी आहेत. या सार्या गतिरोधनंतर तब्बल 15 वर्षांनी विमान सेवेचा मुहूर्त लागला. आता सोलापूर निश्चित विकसित होणार!
आजच्या विमान सेवा शुभारंभाला मुख्यमंत्री फडणवीस येणार होते. पण खराब हवामानामुळे मुंबईहून त्यांचे विमान उडाले नाही.
हवाई क्षेत्राशी सोलापूर जोडल्याने आर्थिक विकासाला चालना मिळणार, असे केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ म्हणाले. राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ व पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते फ्लाय 91 विमान कंपनीच्या विमानाला झेंडा दाखवून विमान सेवेचा शुभारंभ करण्यात आला.
ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात सोलापूर ते मुंबई विमान सेवा सुरू करणार तसेच उड्डान योजनेअंतर्गत सोलापूर येथून तिरुपती, हैदराबाद व बेंगलोरला विमान सेवा सुरू करणार, असेही मोहोळ म्हणाले.
यावेळी खा. प्रणिती शिंदे, खा. धैर्यशील मोहिते पाटील, आ. सर्वश्री विजयकुमार देशमुख, सुभाष देशमुख, समाधान आवताडे, सचिन कल्याणशेट्टी, रणजीतसिंह मोहिते पाटील, देवेंद्र कोठे, उत्तम जानकर, अभिजित पाटील, राजू खरे, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, पोलिस आयुक्त एम. राजकुमार, पालिका आयुक्त सचिन ओंबासे, मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, तसेच माजी खा. जय सिद्धेश्वर महास्वामी, माजी आ. राजेंद्र राऊत, राम सातपुते, अध्यक्ष रोहिणी तडवळकर, शहाजी पवार, शशिकांत चव्हाण, विमानतळ प्राधिकरण संचालक चंद्रेश वंजारा, फ्लाय नाईन्टी वन कंपनीचे सीईओ दिनेश चाको उपस्थित होते.
पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी आजचा हा दिवस सोलापूर साठी आनंदाचा असे सांगून सोलापूरच्या उद्योग, व्यवसाय व पर्यटन वाढीसाठी महत्वपूर्ण आहे. पहिल्या टप्प्यात गोवा येथे सेवा सुरू होत असून गोवा येथून देश व विदेशात सर्व ठिकाणी विमानाने प्रवास करणे शक्य होणार आहे, असे गोरे म्हणाले.
आ. कोठे यांचे कौतुक
युवा आ.देवेंद्र कोठे व आ.सचिन कल्याणशेट्टी आणि पालकमंत्री गोरे या त्रिमूर्तीनी अखेरच्या टप्प्यात जोर लावला. पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी आपल्या भाषणात आ.कोठे यांचा विशेष उल्लेख केला, तेव्हा उपस्थितांनीही जोरदार दाद दिली.
What's Your Reaction?






