प्रियांका नगर ते विश्व सोसायटी येथे रस्त्याचे काम सुरू

 माजी नगरसेविका राजश्री चव्हाण यांच्या प्रयत्नला यश  

Jun 10, 2025 - 00:46
 0  44
प्रियांका नगर ते विश्व सोसायटी येथे रस्त्याचे काम सुरू

सोलापूर : जुळे सोलापूर भागातील प्रभाग क्रमांक २६ मधील प्रियांका नगर ते विश्व सोसायटी येथे रस्त्याचे कामाला अखेर सुरुवात झाली आहे. येथील माजी नगरसेविका राजश्री चव्हाण यांच्या प्रयत्नला यश आले आहे. 
दरम्यान, प्रभाग क्रमांक २६ मधील प्रियांका नगर ते विश्वसोसायटी अनेक वर्षांपासून मूलभूत सुविधांचा अभाव होता. येथे राहणाऱ्या नागरिकांना महापालिकेच्या कुठल्याच सोयी सुविधा नव्हत्या. प्रभागाच्या माजी  नगरसेविका राजश्री चव्हाण यांना सदर परिसरातील नागरिकानी समक्ष भेटून निवेदन दिले होते. याच निवेदनाची दखल घेऊन माजी नगरसेविका राजश्री चव्हाण यांनी सोलापूर महानगरपालिका आयुक्त यांना लेखी निवेदन देऊन सुविधांची  मागणी केली. याबाबत सातत्याने पाठपुरावा केला होता. 
त्यानुसार शासनाच्या मूलभूत सोयी सुविधा योजनेअंतर्गत पाण्याची पाईपलाईनसह शासनाच्या सुवर्ण जयंती योजनेअंतर्गत ड्रेनेज लाईन करण्यात आली. महानगरपालिका आयुक्त डॉ. सचिन ओबासे यांच्याकडे रस्त्यासंबंधी मागणी केली असता आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना सुचित करत सदरचे रस्त्याचे काम सुरू केले असून लवकरच तेथील नागरिकांची रस्त्याबाबतची गैरसोय दूर होणार असल्याने तेथील नागरिकांमध्ये आनंद आनंदाचे वातावरण आहे. यामुळे माजी नागसेविका राजश्री चव्हाण यांचे नागरीकातून कौतुक केले जात आहे.   यावेळी जमखंडी काका,गुरव काका, जगताप काका,झाडबुके साहेब, कटगेरी सर, वेदांत बाबे, भाजपचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अनिल चव्हाण उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow