पर्यावरण रक्षक उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांचा वृक्षस्नेही निर्मल वारी, हरित वारी अभियान गौरव
वटपौर्णिमेनिमित्त देहू येथे वृक्षदायी प्रतिष्ठानच्या 'निर्मल वारी – हरित वारी' अभियानांतर्गत आयोजित कार्यक्रमात सोलापूरच्या उपमहापौर ज्ञानेश्वरी महेश देवकर यांचा पर्यावरण संवर्धनातील योगदानाबद्दल 'वृक्षस्नेही' म्हणून सन्मान करण्यात आला. संत तुकाराम महाराजांचे वंशज ह.भ.प. शिवाजीराव मोरे महाराज यांच्या हस्ते त्यांना सन्मानपत्र व अभंग गाथा प्रदान करण्यात आली. कार्यक्रमात मोठ्या प्रमाणावर वटवृक्ष लागवड करून पर्यावरण संरक्षणाचा संदेश देण्यात आला.
देहू : वृक्षदाई प्रतिष्ठान, श्रीक्षेत्र देहू यांच्या वतीने आयोजित 'निर्मल वारी – हरित वारी' अभियानांतर्गत वटपौर्णिमेच्या निमित्ताने वटवृक्ष लागवड व वृक्षपूजन प्रसंगी संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांचे वंशज ह.भ.प.शिवाजीराव मोरे महाराज यांच्या हस्ते उपमहापौर ज्ञानेश्वरी महेश देवकर यांना सन्मानित करणेत आले.
वृक्षदायी प्रतिष्ठान, श्री क्षेत्र देहू या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ह.भ.प. शिवाजीराव महाराज मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली देहू परिसरात मोठ्या प्रमाणावर वडाच्या रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणाऱ्या या उपक्रमांतर्गत हजारो वडाच्या रोपांची लागवड करण्यात येत असून, हरित महाराष्ट्राच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. यावेळी पर्यावरण संरक्षणासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिला लोकप्रतिनिधींचा 'वृक्षस्नेही' म्हणून सन्मान करण्यात आला. यामध्ये सोलापूरच्या उपमहापौर तथा पर्यावरण रक्षक ज्ञानेश्वरी महेश देवकर यांच्या पर्यावरण विषयक कार्याचा विशेष गौरव करण्यात आला. त्यांना सन्मानपत्र व संत तुकाराम महाराजांची अभंग गाथा प्रदान केली.
या कार्यक्रमास नवी मुंबईच्या महापौर सुजाता पाटील, पुणे महापौर मंजुषा नागपुरे, पिंपरी-चिंचवडच्या उपमहापौर, देहूच्या नगराध्यक्षा पूजा दिवटे, पोलीस उपायुक्त श्वेता खेडकर, सारिका शेळके तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते.
What's Your Reaction?