शरद, शारदासह ७ सहकारी कारखान्यांचा लिलाव

चाकोते परिवाराच्या ताब्यातील शरद आणि पूर्व भागातील नेत्यांची शारदा सूत गिरणी भंगारात, अक्कलकोट कारखान्याचाही लिलाव होणार! सहकारात स्वाहाकार..

Feb 3, 2026 - 00:39
 0  324
शरद, शारदासह ७ सहकारी कारखान्यांचा लिलाव

 (विजयकुमार पिसे)

सहकारात स्वाहाकाराचा दुसरा प्रकार महाराष्ट्रात या महिनाभरात पाहायला मिळाला. भाजपा नेते शेखर चरेगावकर यांनी 112 कोटींचा बँक़ घोटाळा केला, त्यामुळे इडी कारवाई झाली. तर सोलापूर जिल्ह्यात काँग्रेस व राष्ट्रवादी नेत्यांनीही स्वाहाकार केला. यापैकी नान्नज येथील *शरद सहकारी सूत गिरणी आणि कुंभारी येथील *शारदा सहकारी सूत गिरणी हे दोन कारखाने बंद पडून अक्षरश: आता भंगारात गेले असावेत. राज्य शिखर बँकेने राज्यातील सात कारखान्यांच्या विक्रीसाठी लिलाव पुकारला आहे. 

   आजपासूनच (2 फेब्रु.) लिलावासाठी फॉर्म विक्री सुरू केली असून 16 तारखेपर्यंत याची मुदत आहे. या दरम्यान निविदाधारकांना 5 ते 7 फेब्रुवारी दोन दिवस या सात कारखान्यांची चल व अचल मालमत्तेची पाहणी करता येईल. यामध्ये अक्कलकोट तालुक्यातील स्वामी समर्थ सहकारी साखर कारखान्याचाही समावेश आहे.   

    नान्नजच्या माळरानावर शरद पवार यांच्या प्रेरणेने व त्यांच्याच नावाने काँग्रेस नेते माजी आ.कै.बाबुराव चाकोते यांनी शरद सहकारी सूत गिरणी सुरू केली होती. नंतर ती तोट्यात गेली. या गिरणीवर चाकोते परिवाराचीच अखेरपर्यंत सत्ता होती. काँग्रेसचे माजी *आ.विश्‍वनाथ चाकोते हे अखेरचे चेअरमन होत. असाच अनुभव कुंभारी येथील शारदा सूत गिरणीचा. शरद पवारांच्या *मातोश्री शारदा यांच्या नावाने पूर्व भागातील काँग्रेस नेत्यांनी सहकार तत्वावर ही सूत गिरणी सुरू केली. पवार समर्थक माजी महापौर *जनार्दन कारमपुरी हे संस्थापक. पण चाकोतेंप्रमाणे त्यांना एक हाती कारभार करण्याची संधी मिळाली नाही.

   संचालक मंडळ व चेअरमन आणि व्हा.चेअरमन यांच्यातील बेदिली, स्वाहाकार धोरणामुळे शारदा सूत गिरणी या दोन दशकात बंद पडली. *शरद आणि *शारदा या मोठ्या विभूतींचे नाव पाहता स्वाहाकारातील बेजबाबदार नेत्यांनी याचे भान ठेवले का?

    शरद पवार आणि सुशीलकुमार शिंदे यांच्याच पक्षाच्या हातात केंद्र व राज्यात सत्ता होती. यथास्थिती मदत करण्याचे त्यांचेही प्रयत्न अयशस्वी ठरले. 

  सोलापुरात विशेषत: पूर्व भागात एकेकाळी सोन्याचा धूर निघतो, असे मानले जायचे. पण नेत्यांच्या स्वाहाकारामुळे यशवंत आणि सोलापूर व शारदा या तीन सूत गिरण्या तसेच औद्योगिक, नागरी, इंदिरा, मर्चंट या सह.बँका बंद पडल्या. त्यामुळे येथील तेलुगू भाषिक उद्योजक आयुष्यातून उठले. आजही दुर्दशा संपलेली नाही. 

    अक्कलकोट तालुक्यातील दहिटणे येथे माजी मंत्री *कै.पार्वतीबाई मलगोंडा यांनी स्थापन केलेला स्वामी समर्थ (पूर्वीची इंदिरा सह,साखर कारखाना) साखर क़ारखाना. भाजपाचे माजी आ. *कै.सिद्रामप्पा पाटील नंतरच्या काळात अखेरपर्यंत चेअरमन होते. त्यांच्याच हातात कारभार असताना बंद पडला. सहकारात स्वाहाकारामुळे परिसरातील उद्योग, रोजगार, शेती आणि शेतकर्‍यांचे अतोनात नुकसान झाले. ते न भरून येणारे. *शेखर चरेगावकर हे अलीकडचे ताजे उदाहरण. भाजपाच्या *खा.मेधा कुलकर्णी यांनी या विरोधात आवाज उठवला. त्या काळात काँग्रेसी नेत्यांनी *तेरी भी चूप मेरी भी.. नीती अवलंबल्यामुळे विकासाला ब्रेक बसला. 

 *मोदींची स्टार्ट अप योजना आणि अमित शाह यांच्यासाऱखा खमक्या सहकारमंत्री मिळाल्यामुळे आता मात्र कुणाची गय नाही.*       

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow