विश्वकर्मा फाऊंडेशनतर्फे २ ऑगस्टला 'उद्योजक व्हा' मार्गदर्शन शिबिर

सोलापुरात विश्वकर्मा फाऊंडेशन व अहिल्यादेवी बहुउद्देशीय सेवा सहकारी संस्थेतर्फे २ ऑगस्ट रोजी 'उद्योजक व्हा' मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. उद्योग, कर्ज आणि शासकीय योजनांची सविस्तर माहिती दिली जाणार आहे.

Jul 26, 2026 - 12:11
 0  10
विश्वकर्मा फाऊंडेशनतर्फे २ ऑगस्टला 'उद्योजक व्हा' मार्गदर्शन शिबिर

सोलापूर | उद्योजकतेची आवड असलेल्या युवक-युवती, महिला आणि इच्छुक व्यावसायिकांना उद्योग क्षेत्रात मार्गदर्शन करण्यासाठी विश्वकर्मा फाऊंडेशन आणि अहिल्यादेवी बहुउद्देशीय सेवा सहकारी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने 'उद्योजक व्हा' या विशेष मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर रविवार, २ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता आयोजित करण्यात आल्याची माहिती विश्वकर्मा फाऊंडेशनचे अध्यक्ष संतोष गायकवाड यांनी दिली.

या शिबिरात उद्योग सुरू करण्यासाठी आवश्यक असलेले गुण, व्यवसायाची निवड, कमी भांडवलात किंवा बिनभांडवली उद्योगांच्या संधी, शेती व शेतीपूरक उद्योग, विविध वस्तूंच्या एजन्सी व्यवसायाची माहिती, गारमेंट उद्योग, बँकेचे डीएसए, लाइफ व जनरल इन्शुरन्स एजन्सी, शेअर मार्केटसह विविध स्वयंरोजगाराच्या संधींबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

याशिवाय उद्योगासाठी आवश्यक असलेले बँक कर्ज कसे मिळवावे, आवश्यक कागदपत्रे कोणती, शासनाच्या विविध महामंडळांच्या कर्ज योजना, मुद्रा लोन, स्टार्टअप इंडिया, स्टँड-अप इंडिया, विश्वकर्मा योजना तसेच विविध अनुदान व सबसिडी योजनांची माहितीही तज्ज्ञांकडून दिली जाणार आहे.

स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची इच्छा असलेल्या युवक-युवती, महिला उद्योजिका आणि नवउद्योजकांसाठी हे शिबिर उपयुक्त ठरणार असल्याने अधिकाधिक नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

शिबिरासाठी पूर्वनोंदणी आवश्यक असून अधिक माहितीसाठी विश्वकर्मा फाऊंडेशन, १२ अ, रेल्वे लाईन, भैय्या चौक, गायकवाड बिल्डिंग, सोलापूर येथे संपर्क साधावा किंवा मो. ९४२२०६५८५७ / ८०८०९३३२०२ या क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow