भारत विकास परिषदेची राष्ट्रीय समूहगान स्पर्धा

ह.दे.प्रशाला अव्वल, जैन गुरूकुल,मेहता प्रशालेसही बक्षिसे

Sep 1, 2025 - 13:16
 0  9
भारत विकास परिषदेची राष्ट्रीय समूहगान स्पर्धा

सोलापूर, : भारत विकास परिषदेच्या वतीने राष्ट्रीय समूहगान स्पर्धा पार पडल्या. यामध्ये हरीभाई देवकरण प्रशालेने  अव्वल क्रमांक पटकावला तर  द्वितीय क्रमांक पारितोषकाचे मानकरी जैन गुरुकुल प्रशाला तर तृतीय क्रमांक वि. मो. मेहता प्रशालेने मिळवला.     सोलापुरातील शिवस्मारक सभागृहात या स्पर्धा घेण्यात आल्या.
   प्रथम क्रमांक  हरिभाई देवकरण प्रशालेने पटकावला तर  द्वितीय क्रमांकाचे पारितोषक जैन गुरुकुल प्रशाला या शाळेला मिळाले. तृतीय क्रमांक वि मो मेहता प्रशाला या शाळेने मिळवला. सकाळी अकरा वाजता या स्पर्धेची सुरुवात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शहर कार्यवाह राजेंद्र जी काटवे व भारत विकास परिषदेचे अध्यक्ष महादेव न्हावकर यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने झाली.  संस्कृत व हिंदी राष्ट्रीय गीतांच्या या स्पर्धेत सहा शाळांच्या संघांनी भाग घेतला. स्पर्धेचे परीक्षक म्हणून श्री गोविंद दाते, सौ अलका आरगडे, सौ वैशाली देशपांडे यांनी काम पाहिले. स्पर्धा संपल्यानंतर त्याच ठिकाणी स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा संघचालक तथा सीए प्रा. डॉ. सुनील जी इंगळे व प्रा. रामकृष्ण पोलमपल्ली यांच्या हस्ते पार पडला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक  रघुनाथ क्षीरसागर,   आभार श्री लक्ष्मीकांत कुर्रा यांनी मानले. 
या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री नरहरी अघोर,सचिव श्री महेश देशपांडे यांनी केले. कार्यक्रमास संस्थेचे सभासद श्री रंगनाथजी बंकापूर, श्री सुधीर देव,प्रा. महेश साठे, नंदिता साठे, हेमाताई मोडक, श्री अनंत मोडक, श्री आनंद मोहोळकर, सुजाता सुतार इत्यादी सभासद, संगीत शिक्षक वर्ग व सहभागी विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow