भाजपच्या खात्यात आणखी एक़ राज्य? हेमंत सोरेन आणि अमित शाह यांची ती भेट

बिहारमध्ये महागठबंधनकडे 12 जागा मागितल्या,पण त्यांनी झिडकारले,नाराज झामुमो लवकरच एनडीएमध्ये सामील.*मोटा भाई का खेला।

Dec 5, 2025 - 13:16
 0  252
भाजपच्या खात्यात आणखी एक़ राज्य? हेमंत सोरेन आणि अमित शाह यांची ती भेट

(विजयकुमार पिसे)
    बिहारच्या विधानसभा निवडणुकीत झिडकारलेली महागठबंधनची एक चूक किती महागात पडू शकते? त्यामुळे याची किंमत त्यांना चुकवावी लागेल. परिणामी झामुमो एनडीए मध्ये दाखल होण्याची चर्चा असून, याचे कारण म्हणजे मुख्यमंत्री हेमंत सोरेन आणि अमित शाह यांची "ती" भेट!
   या भेटीत काय चर्चा झाली, हे अद्याप बाहेर आलेले नाही. पण  त्यानंतर राज्यपाल संतोष गंगवार यांनीदेखील अमित शाह यांची भेट घेतली. *पिक्चर अभी बाकी है।
   बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीत झामुमोने महागठबंधनकडे 12 जागा मागितल्या होत्या. पण राजद, काँग्रेसनी झामुमोला झिडकारले. त्यांना एकही जागा सोडली नाही. त्यामुळे हेमंत सोरेन यांनी सूड उगवायचा निर्णय घेतला, असेे मानले जाते. तूर्तास सोरेन यांचा झामुमो पक्ष तसेच काँग्रेस, राजद यांच्यात संवाद राहिलेला नाही. या घडामोडी पाहता मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी गृहमंत्री अमित शाह यांची दिल्लीत भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत सोरेन यांच्या आमदार पत्नी कल्पना सोरेन देखील उपस्थित होत्या.
मुख्यमंत्री सोरेन यांचा दिल्ली दौरा, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची याच दरम्यान झारखंडचे राज्यपाल संतोष गंगवार यांनी घेतलेली भेट यामुळे चर्चेला वेगळा रंग आला आहे. गतवर्षी हरियाणाबरोबर झारखंडमध्ये विधानसभेची निवडणूक पार पडली. हेमंत सोरेन यांनी पुन्हा सत्ता टिकवली. भाजपाने बांगलादेशी घुसखोरीच्या मुद्द्यावर ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. पण भाजपाला फक्त 21 जागा जिंकता आल्या. झामुमोने 34 जिंकल्या बहुमतासाठी 41 जागांची गरज होती. तेव्हा काँग्रेस 16, राजद 3, डावे पक्ष 2 जागा जिंकून झामुमोला पाठिंबा दिला. आता उलट फेर होईल. झामुमो 34 आणि भाजपा 21 अशी युती होऊन तिथे एनडीएची सत्ता येईल. मुख्यमंत्री अर्थात हेमंत सोरेनच राहतील. भाजपा बाहेरून किंवा सत्तेत सहभागी होईल, हे अजून स्पष्ट झालेले नाही.
     विशेष म्हणजे भ्रष्टाचाराच्या आरोपावरून मुख्यमंत्री सोरेन सहा महिने तुरुंगात होते. या काळात त्यांनी आपल्या एका सहकार्‍यास सीएम केले होते. (दिल्ली आम आदमी पॅटर्न/आतीशी सीएम). तुरुंगातून सुटका होताच सोरेन पुन्हा मुख्यमंत्री झाले. त्यांच्याच नेतृत्वाखाली निवडणूकही जिंकली. (तिकडे दिल्लीत मात्र विधानसभा निवडणुकीत आप पक्ष पराभूत झाला होता) झारखंडमध्ये सोरेन यांचा पक्ष मोठा भाऊ आहे, त्यामुळे ते मुख्यमंत्री कायम राहतील. पण एनडीएसोबत येतील. अर्थात भाजपाची राज्यातील सत्तेत फिफ्टी फिफ्टी असेल. यालाच म्हणतात *मोटाभाई का खेला!
     

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow