हिंदू शौर्य दिनानिमित्त विहिंपतर्फे बार्शीत महाआरती!पोलिसांच्या रूट मार्चने वेधून घेतले लक्ष

मुघलों के छाती पर भगवा लहराया है। कब्र से उठकर देख ले बाबर मंदिर वही बनाया है!

Dec 8, 2025 - 12:14
 0  250
हिंदू शौर्य दिनानिमित्त विहिंपतर्फे बार्शीत महाआरती!पोलिसांच्या रूट मार्चने वेधून घेतले लक्ष

सोलापूर,पंढरपूर,अकलूज,नातेपुते,करकंब,करमाळा,वळसंगमध्येही महाआरतीनिमित्त हिंदू युवकांचा जागर

६ डिसेंबर १९९२ हिंदू शौर्य दिनानिमित्त सोलापूर, बार्शी, वळसंग या शहरांमध्ये शनिवारी ६ रोजी रोजी हिंदू स्वाभिमान व पराक्रमाचा जागर करणेसाठी विश्‍व हिंदू परिषद बजरंग दलाच्या वतीने शौर्य दिन महाआरती करण्यात आली.

   यानिमित्त मंदिरांमध्ये सामूहिक आरती आणि अन्य उपक्रमांचे आयोजन केले होते. अयोध्या रामजन्मभूमी बंदीवासातून मुक्त करण्यासाठी सौगंध राम की खाते है, मंदिर वही बनायेंगे हा संकल्प हिंदू समाजाने केला होता. अखेर मंदिर वही बनायेंगे, मंदिर भव्य बनायेंगे। ही स्वप्नपूर्ती झाली, असे विहिंपचे विभाग सहमंत्री विजयकुमार पिसे यांनी सांगितले.

   १९९२ मध्ये साडेपाचशे वर्षांचा बाबरी ढाँचा भुईसपाट करून कलंक पुसून हिंदूंनी पराक्रम केला. स्वाभिमानाचा हा दिवस. शौर्य,पराक़्रमाचा दिवस. या निमित्ताने विश्‍व हिंदू परिषद बजरंग दलातर्फे बार्शी शहरात हनुमान नगर संकटमोचन मंदिरात पत्रकार विजयकुमार पिसे,जिल्हा सहमंत्री बापूसाहेब कदम,प्रखंड मंत्री अमर शुक्ला यांच्या हस्ते महाआरती झाली. शत्रूला घुसकर मारेंगे। ही छत्रपती शिवरायांची नीती हिंदू समाजाने कायम लक्षात ठेवावी,जेणेकरून कुणीही आपल्या नादाला येणार नाही, असा समर्थ आणि सामर्थ्यवान हिंदू समाज झाला पाहिजे,असे आवाहन पिसे यांनी युवकांना उद्देशून केले.

   महाआरतीप्रसंगी उपस्थित अडीचशे तरुणांनी हिंदू जागर केला. दरम्यान महाआरतीनिमित्त बार्शी पोलिसांनी हनुमान नगर भागात रूट मार्च काढला होता. पोलिसांच्या या रूट मार्चने बार्शीकरांचे लक्ष वेधून घेतले होते.

    सोलापुरात पूर्वविभाग राम मंदिरांमध्ये महाआरती पार पडली. यावेळी हभप अभिमन्यू महाराज डोंगरे, पुरुषोत्तम उडता,संजय जमादार, बाबू गिरगल, नरेंद्र काळे, जगदीश कर्रे, अविनाश कैयावाले, राजेश मनसावाले, जय साळुंके यांच्यासह मोठ्यासंख्येने हिंदू बांधव उपस्थित होते. याशिवाय वळसंग शहरातही उत्स्फूर्तपणे युवकांनी महाआरती केली.

     पंढरपूर, अकलूज, नातेपुते/दहीगाव, करकंब, करमाळा येथे हिंदू शौर्य दिनानिमित्त विहिंप बजरंग दल, दुर्गा वाहिनीच्या वतीने महआरतीचे कार्यक्रम झाले. *दहीगाव येथे व्यसनमुक्ती अभियान विभाग संयोजिक प्रगती नाकुरे यांनी घेतले. *अकलूज येथे जिल्हा सहमंत्री शिवाजी घोडके यांनी हनुमान चालीसा व महाआरती केली. तर *करकंब येथे बजरंग दल गोरक्षा विभाग प्रमुख आकाश धोत्रे यांनी शेकडो युवकांच्या उपस्थितीत महाआरती केली. *करमाळा पांडे येथे प्रखंड संयोजक लिंगेश्‍वर तटके व अण्णासाहेब गोसावी यांनी नशामुक्तीचा कार्यक्रम घेतला.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow