केसरी 20 ई सिटी बसला ट्वेन्टीचा मुहूर्त? देवाभाऊ आहेत ना?
सोने पे...! १५ ऑगस्टचा मुहूर्त हुकला; मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष येताहेत २०रोजी सोलापुरात!
(विजयकुमार पिसे)
देर आये, दुरुस्त आये, पण कधी कधी ही देरी सुवर्णसंधीमध्ये रूपांतरीत होते. सोलापुरात ई बस कधी येणार याची नुसतीच हवाहवाई चर्चा सुरू होती. पण आता केसरी 20 ई बस सोलापूरकडे मार्गस्थ झाल्या अशी पक्की वार्ता असून त्या १७ऑगस्टला सोलापुरात दाखल होताहेत. पण यासाठी ट्वेन्टीचा शुभमुहूर्त नक्की होईल असे दिसते. कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपाच्या पश्चिम महाराष्ट्र विभागीय बैठकीसाठी २०ऑगस्टला सोलापूरला येेणार, अशी माहिती समोर येतेे आहे.
भाजपा मनपा सत्तेत येऊन सहा महिने होत आले, पण अद्याप गाडी सुरळीत नाही, तसेच मनपा परिवहन समिती सहेतुक गठीत होत नाही, यामागे बहुदा काही तर्क असावेेत. असो.. त्याआधी मनपा पदाधिकार्यांना ई बसची घाई असून गत सहा महिन्यांपासून बस कधी येणार याची हवाईचर्चा आहे. नवीन अपडेटनुसार केसरी १००ई बसपैकी पहिल्या टप्प्यात 20 ई बसगाड्या १७तारखेला दाखल होणार आहेत. त्या यापूर्वीच आल्या असत्या तर १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचा मुहूर्त होताच. ई बसचा प्रवास लांबला हे बरेच झाले. कारण सत्तेत कुणी? देवाभाऊ ओरिजनल भाजपाई आहेत म्हणून!
भाजपाची पश्चिम महाराष्ट्र विभागीय बैठक २०ऑगस्ट रोजी निश्चित झाली आहे. या बैठक़ीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण तसेच या विभागातील लोकप्रतिनिधी, मंत्री देखील या काळात उपस्थित राहणार आहेत. फक्त प्रश्न आहे, शिवसेनेचा. परिवहनमंत्री प्रताप सरनाईक आहेत ना. असो..
इथंही ऑपरेशन लोट्स..
दरम्यान ई बसेसकरिता बस डेपो व चार्जिंग सेंटर पूर्णत्वास आले आहे, अशी प्रशासनाची माहिती असून २०तारीख ठरलीच तर थोडी घाई करावी लागेल. शहरात ५०नवे स्मार्ट बस थांबे उभारले जाणार आहेत, यासाठी लोट्स अॅड.कंपनीला मक्ता दिला आहे. प्राप्त माहितीनुसार स्मार्ट बस थांबे तयार करण्याचे काम सोलापुरातच सुरू आहे. पण देवाभाऊ यांच्या हस्ते मुहूर्त ठरला तर सोने पे सुहागा..!
What's Your Reaction?