प्र.26 जुळे सोलापुरात पावसामुळे नगरांत शिरले पाणी
नगरसेविका राजश्री चव्हाण मदतीसाठी धावून आल्या. यांची तत्परता दखलपात्र

सोलापूऱ : जुळे सोलापूग़ प्रभाग 26 मधील अनेक नगरांमध्ये पावसामुळे समस्या निर्माण झाल्या आहेत. त्याची पाहणी नगरसेविका सौ.राजश्री अनिल चव्हाण यांनी केली. काल रात्री प्रचंड मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे प्रभाग 26 मधील हेरिटेज फॉर्म, बँक कॉलनी, परमेश्वर नगर, कल्याण नगर, द्वारका नगरमध्ये घरात, नगरामध्ये पावसाचे पाणी थांबल्यामुळे सदर नगरातील नागरिकांना संकटाला सामोरे जावे लागले. यासंदर्भात नगरसेविका सौ राजश्री चव्हाण यांनी तात्काळ महानगरपालिका आयुक्त श्री सचिन ओंबासे यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी संबंधित झोन अधिकारी यांना आदेश दिले.
झोन 5 कडील बंमकटी, ढवळे, यांना समक्ष घेऊन सदर नगरामध्ये पावसाळ्यामुळे पाणी थांबलेले कुठल्या प्रकारे बाहेर काढले जाईल याची समक्ष पाहणी करून संबंधित अधिकारी यांना तात्काळ तेथील समस्या दूर करण्यासाठी नगरसेविका सौ राजश्री चव्हाण यांनी कळविले. त्याची दखल घेत सदर नगरातील समस्या आजचे आज दूर करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक, महिलावर्ग, विद्यार्थी यांनी आपले मनोगत व्यक्त केले की, आपल्यासारखे जनतेसाठी झटणारे ऊन, पाऊस, वारा,याची तमा न घेता केवळ जनतेच समाधान कसे यासाठी झटणारे नगरसेविका सौ राजश्री चव्हाण व सामाजिक कार्यकर्ते अनिल चव्हाण यांचे उपकार मानावे तेवढे कमीच आहेत. विशेष म्हणजे त्यांच्या नगरसेवक कार्यकाल संपलेला असताना सुद्धा नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी अग्रेसर आहेत. कर्तव्यदक्ष, जनतेच्या हाकेला धावून येणार्या नगरसेविका सौ राजश्री चव्हाण आम्हाला लाभल्या हे आमचे भाग्य समजतो अशा भावना व्यक्त केल्या.
What's Your Reaction?






